या ५ कारणांमुळे त्वचा अतिरिक्त तेलकट होते!

त्वचेचा तेलकटपणा अनेकांना त्रासदायक वाटतो.

Updated: May 23, 2018, 11:18 AM IST
या ५ कारणांमुळे त्वचा अतिरिक्त तेलकट होते! title=

मुंबई : त्वचेचा तेलकटपणा अनेकांना त्रासदायक वाटतो. त्यामुळे सौंदर्याच्या समस्या उद्भवतात. पण त्वचेचा तेलकटपणा हा जेनेटीक्सवरून ठरतो. परंतु, इतर काही घटकांमुळे त्वचेतून होणारी तेलाची निर्मिती वाढते. तुम्हाला तुमचा चेहरा अचानक तेलकट झालेला दिसतो का? मग त्यामागे ही कारणे असू शकतील. 

मासिक पाळी :

प्रत्येक महिन्यात शरीर जेव्हा नियमित हार्मोनल सायकल मधून जाते तेव्हा हॉर्मोनमध्ये होणाऱ्या चढ-उतारामुळे तेलग्रंथीं उत्तेजित होतात आणि त्वचा तेलकट होते.

ताण:

शारीरिक आणि मानसिक ताणामुळे तेलग्रंथीतून तेलाची निर्मिती अधिक प्रमाणात होते. ताणावर मात करण्यासाठी योगसाधना किंवा ध्यान केल्यास फायदा होईल. परिणामी त्वचा तेलकट होण्यास आळा बसेल.

वातावरण:

घामग्रंथींची अॅक्टिव्हिटी वातावरणानुसार बदलत नसली तरी गरम आणि अति दमट वातावरणात त्वचा तेलकट होते.

प्युबर्टी:

प्युबर्टीच्या काळात हार्मोन्समध्ये चढ-उतार झाल्याने androgen ची पातळी वाढते व त्यामुळे त्वचा तेलकट होते. androgen ची पातळी वाढणे हा त्वचेच्या sebaceous ग्रंथी मॅच्युअर झाल्याचा संकेत आहे. आणि ग्रंथी मॅच्युअर झाल्यावर त्वचा तेलकट होते.

मेकअप:

तेलकट त्वचा आणि ब्रेकआऊट्स कव्हर करण्यासाठी मेकअप कामी येतो. परंतु, अतिरिक्त मेकअपमुळे त्वचा तेलकट होते. म्हणून कॉमेस्टीक घेताना ऑईल फ्री आणि non-comedogenic प्रॉडक्ट्स घ्या.