जोडीदाराची निवड करताना या ५ गुणांचा विचार करा!

कोणतेही नाते निभावण्यासाठी साथीदारीची साथ अत्यंत महत्त्वाची असते. 

Updated: May 23, 2018, 10:52 AM IST
जोडीदाराची निवड करताना या ५ गुणांचा विचार करा! title=

मुंबई : कोणतेही नाते निभावण्यासाठी साथीदारीची साथ अत्यंत महत्त्वाची असते. पार्टनर जर चांगला, समजूतदार असेल तर जिवनाची यात्रा सुखकर होते. प्रत्येकजण उत्तम जोडीदाराच्या शोधात असतो. पण रंग रुपापेक्षा व्यक्तीचा स्वभाव नात्यात जास्त महत्त्वाचा ठरतो. तर जोडीदाराची निवड करताना त्याच्यात या ५ गुणांचा शोध घ्या. एका उत्तम जोडीदारात हे गुण नक्कीच असतात. तर पहा कोणते आहेत ते ५ गुण...

उणीवांचाही स्वीकार

चांगला जोडीदार तो असतो जो आपल्या चूका स्वीकारतो. एक चांगला जोडीदार आपल्या चांगल्या गोष्टींप्रमाणेच आपल्यातील उणीवाही खुलेपणाने स्वीकारतो.

वचनाला बांधिल

वचन पाळणारा पार्टनर नेहमी उत्तम जोडीदार म्हणून सिद्ध होतो. आपल्या पार्टनरला दिलेले वचन तो कोणत्याही किंमतीत पूर्ण करतो. असे लोक खोट्या गोष्टींपासून नेहमीच दूर राहतात.

पुढे जाण्यासाठी नेहमीच प्रोत्साहन

तुमच्या प्रगतीत तुम्हाला साथ देणारा आणि कायम पुढे जाण्यासाठी तुम्हाला प्रोत्साहन देणारा पार्टनर नेहमीच सर्वांना भावतो. यामुळेच प्रगतीचे नवे मार्ग तुम्हाला सापडतात आणि भविष्यात तुम्ही पुढे जावू शकता.

चुकीचा स्वीकार

कोणत्याही नात्यात वाद हे होतातच. पण आपल्या चुकीचा स्वीकार केल्याने अनेक वाद संपतात, निवळतात. याउलट चूकीचा स्वीकार न केल्याने पार्टनर दुखावला जातो. वाद वाढतो आणि वाढलेला वाद विकोपालाही जावू शकतो.

वेळ देणे

नात्यात पार्टनरला वेळ देणे अत्यंत महत्त्वाचे. एक उत्तम पार्टनर सतत कामात व्यस्त राहण्याऐवजी आपल्या साथीदारासोबत वेळ घालवण्याची एकही संधी सोडत नाही. ते नेहमी नात्याची वीण घट्ट करण्याकडे भर देतात.