आता खुर्चीवर बसल्या बसल्या कमी करू शकता Belly Fat!

आज आम्ही तुम्हाला अशी एक गोष्ट सांगणार आहोत ज्यामध्ये तुम्ही खुर्चीवर बसल्या बसल्या बेली फॅट कमी करू शकणार आहात.

Updated: Oct 27, 2022, 11:28 PM IST
आता खुर्चीवर बसल्या बसल्या कमी करू शकता Belly Fat! title=

मुंबई : आजकाल चुकीच्या जीवनशैलीमुळे अनेक आजार बळवातात. यामध्ये अजून एक समस्या मागे लागते ती म्हणजे, लठ्ठपणाची. अयोग्य आहार आणि सध्याच्या जीवनशैलीमुळे लठ्ठपणाची समस्या मोठ्या प्रमाणात दिसून येतेय. पोटावरील चरबी कमी व्हावी यासाठी अनेकजण प्रयत्न करतात. यामध्ये डाएट करतात किंवा जीम लावतात. मात्र आज आम्ही तुम्हाला अशी एक गोष्ट सांगणार आहोत ज्यामध्ये तुम्ही खुर्चीवर बसल्या बसल्या बेली फॅट कमी करू शकणार आहात.

हँगिंग बॉडी 

घरच्या घरी खुर्चीसह हा व्यायाम करणं अधिक प्रभावी आहे. याचा परिणाम थेट पोटाच्या चरबीवर होतो. हा व्यायाम करण्यासाठी खुर्चीवर बसून दोन्ही हातांनी हँडल धरा. यानंतर आता शरीराला वर उचलण्याचा प्रयत्न करा. या व्यायामात तुमचे शरीर 90 अंशाच्या कोनाप्रमाणे दिसेल. काही सेकंद शरीर असंच राहूद्या. यामुळे बेली फॅट कमी होण्यास मदत होईल.

ट्विस्ट 

खुर्चीवर बसून तुमच्या शरीराला ट्विट दिल्याने फॅट बर्न होण्यास मदत होईल. यामध्ये खुर्चीत बसून तुमचं शरीर उजवीकडे वळवा आणि त्यानंतर डावीकडे वळवा. असं केल्याने तुमचं शरीर ट्विस्ट होईस. हा व्यायाम आळीपाळीने दोन्ही बाजूंनी करा. हे करताना तोल सांभाळणं गरजेचं आहे.

सिजर एक्सरसाइज

यामध्ये तुमची पाठ सरळ ठेवून एका खुर्चीवर बसा. दोन्ही हात खुर्चीच्या हँडलवर ठेवा आणि पाय हवेत वर करा. यानंतर तुमचे पाय क्रॉसिंगमध्ये हलवा. तुम्हाला हे किमान 10 वेळा करावं लागेल. यामुळे पोटावरील चरबी कमी होण्यास मदत होऊ शकते.

कॅट काऊ

ही पोझ करण्यासाठी तुम्ही पुढे सरकून खुर्चीवर सरळ बसा. आता दोन्ही हात पायांवर ठेवा. आता तुमचे शरीर पुढे आणि खांदे मागे खेचा. जेव्हा तुम्ही छाती पुढे आणता तेव्हा दीर्घ श्वास घ्या आणि सोडा. ही पोझ 3-3 च्या सेटमध्ये काही काळ करा.