रोम छिद्रावर गुणकारी उपाय

ज्यांची त्वचा तेलकट असते त्यांना रोम छिद्राची समस्या जास्त असते.

Updated: Aug 28, 2019, 06:52 PM IST
रोम छिद्रावर गुणकारी उपाय

मुंबई : प्रत्येक स्त्री सुंदर चेहऱ्यासाठी अनेक नवनवीन उपाय चेहऱ्यावर करत असते. त्यासाठी अनेक सौंदर्य प्रसाधनांचा देखील सर्रास वापर होतो. त्याचा वाईट परिणाम चेहऱ्यावर होत होते. कारण या प्रसाधनांमध्ये अनेक प्रकारच्या रसायनांचा वापर करण्यात आलेला असतो. परंतु या सुंदर त्वचेवर जर रोम छिद्र असतील तर चेहरा निस्तेज दिसतो. विशेषतः ज्यांची त्वचा तेलकट असते त्यांना रोम छिद्राची समस्या जास्त असते. वयाप्रमाणे हे छिद्र मोठे होतात. त्यामुळे या छिद्रांवर काही घरगुती उपाय फायदेशीर ठरतात. 

काकडी आणि लिंबू - खुले रोम छिद्र घालवण्यासाठी तुम्ही काकडी आणि लिंबूचा वापरू शकता. काकडी आणि लिंबूचा रस एकत्र करुन लावल्याने चेहऱ्यावरील रोम छिद्र भरण्यास मदत होईल. 

केळी - केळी  त्वचेसाठीही फार गुणकारी आहे. आठवड्यातून दोनदा केळी मॅश करुन चेहऱ्यावर लावा. तुमच्या चेहऱ्याचे रोम छिद्र भरतील 

दुध आणि ओट्स - २ चमचे ओट्समध्ये, १ चमचा गुलाबजल आणि १ चमचा मध एकत्र करुन घ्या. तयार केलेले मिश्रण १० मिनीटे चेहऱ्यावर लावा. त्यानंतर चेहरा स्वच्छ पाण्यात धूवा. चेहऱ्यावर असलेले.