उन्हामुळे काळे पडलेयत हात? घरच्या घरी 5 टिप्सने दूर होईल काळपटपणा!

Remove Blackness from Hands: उन्हाळ्यात उन्हामुळे हात काळे झाले असतील तर हाताचा काळेपणा दूर करण्यासाठी बेसन, काकडी, बटाट्याचा रस, दही आणि कच्चे दूध यांचा वापर करू शकता.

Pravin Dabholkar | Updated: Jun 18, 2024, 04:52 PM IST
उन्हामुळे काळे पडलेयत हात? घरच्या घरी 5 टिप्सने दूर होईल काळपटपणा! title=
Remove blackness from hands

Remove Blackness from Hands: अनेकांना कडक उन्हाचा त्रास होतो. उन्हात बाहेर पडताना काहीजण मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीनच्या मदतीने आपण आपला चेहरा आणि मान झाकतात. पण हातांना सनस्क्रीन लावणे अनेकांना आवश्यक वाटत नाही. जास्त वेळ उन्हात राहील्याचा परिणाम आपल्या हातावरही दिसून येतो. शरीराच्या इतर भागापेक्षा हात वेगळे दिसतात. हाताचा रंग गडद काळा होतो. घरच्या घरची 5 टीप्सचा वापर करुन तुम्ही हातावरचा काळपटपणा दूर करु शकता. कसे ते जाणून घेऊया. 

कच्चे दूध

हाताचा काळेपणा दूर करण्यासाठी कच्चे दूध उपयुक्त ठरू शकते. कच्च्या दुधात लॅक्टिक ॲसिड असते.  जे तुमच्या काळपट झालेल्या हातावर ब्लीचिंग एजंट म्हणून काम करते. अती सूर्यप्रकाशामुळे तुमचे हात काळे झाले असतील तर तुम्ही कच्चे दूध वापरू शकता. यासाठी कच्चे दूध घ्या. ते हाताला लावा आणि हलक्या हाताने चोळा. 

20-25 मिनिटांनी साधारण पाण्याने हात धुवा. कच्चे दूध त्वचेला एक्सफोलिएट करते. यामुळे हातातील मृत त्वचेच्या पेशी निघून जातात. तुमची त्वचा कोरडी, खडबडीत आणि निर्जीव असेल तरीही तुम्हाला फायदा जाणवेल.

बेसन

बेसनाचा वापर शतकानुशतके केला जात आहे. जर सूर्यप्रकाशामुळे हातावर काळेपणा जमा झाला असेल तर तुम्ही बेसनाचा वापर करू शकता. बेसनमुळे त्वचेची टॅनिंग दूर होते. यासाठी सर्वात आधी 2 चमचे बेसन घ्या. त्यात गुलाबपाणी मिसळा. आता याने हात स्क्रब करा. अर्ध्या तासानंतर हात पाण्यात भिजवा. बेसनामुळे हातांचा रंग सुधारतो आणि त्वचेवर चमकही येते.

कोरफड 

हाताचा काळेपणा दूर करण्यासाठी कोरफडीचाही वापर केला जाऊ शकतो. यासाठी हातावर कोरफडीचे जेल लावा. अर्ध्या तासानंतर हात स्वच्छ करा. सूर्यप्रकाशामुळे जळलेली त्वचा बरी करायची असेल तर काकडीचाही वापर करु शकता. यामुळे जळजळ आणि खाज कमी देखील करू शकते. यासोबतच काळेपणाही दूर होतो. यात थोडा लिंबाचा रस टाकल्यासही फायदा जाणवू शकतो. 

बटाट्याचा रस

हातावरील काळेपणा दूर करण्यासाठी बटाट्याचा रस देखील तुम्ही वापरु शकता.  बटाट्याच्या रसामध्ये कॅटेकोलेज नावाचे एन्झाइम असते. यामुळे काळपट झालेला त्वचेचा रंग सुधारतो. त्वचेवरील काळे डाग आणि टॅनिंग निघून जाईल. बटाट्याचे काप करा. आता याने हात चोळा. काही वेळाने हात धुवा. यानंतर तुम्हाला चांगला रिझल्ट दिसू शकतो. 

दही

हाताचा काळेपणा दूर करण्यासाठी दह्याचा वापर करु शकता. यासाठी एक वाटी दही घ्या, त्यात चिमूटभर हळद घाला. आता ते हातावर लावा. 20-30 मिनिटांनी स्वच्छ पाण्याने हात धुवा. यामुळे हातांचा काळेपणा दूर होऊन त्वचेचा रंग उजळतो. दही त्वचेला मॉइश्चरायझ करते आणि त्वचा टोन्ड बनवते.