पेनकिलर्सचे घेण्याचे 'हे' आहेत दुष्परिणाम!

पोट, पाठ, कंबर अगदी डोकंही दुखाल्यावर आपण अनेकदा पेनकिलर्स खातो.

Darshana Pawar Darshana Pawar | Updated: Feb 7, 2018, 07:58 PM IST
पेनकिलर्सचे घेण्याचे 'हे' आहेत दुष्परिणाम! title=

नवी दिल्ली : पोट, पाठ, कंबर अगदी डोकंही दुखाल्यावर आपण अनेकदा पेनकिलर्स खातो. स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्यायला, डॉक्टरकडे जायला आपल्याकडे वेळ नसतो. मग आपण अगदी सहज पेनकिलर्स घेऊ लागतो. तुम्हीही असेच करता का? पण तुम्हाला माहित आहेत का, पेनकिलर्सचे साईड इफेक्टस...? चला तर मग जाणून घेऊया...

पेनकिलर्स घेणे गरजेचे आहे का?

सर्वप्रथम तुम्हाला होणाऱ्या त्रासाचे, दुखण्याचे निश्चित कारण जाणून घ्या. अगदीच असह्य दुखणे असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्यानेच पेनकिलर्स घ्या. मात्र पेनकिलर्समुळे रोग, आजार, दुखणे पूर्णपणे बरे होत नाही तर त्यावर त्यातपुरता आराम मिळतो.
जर वारंवार त्रास होत असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करायला हवेत.

पेनकिलर्स घेण्याचे काही दुष्परिणाम...

  • तुम्हाला माहित आहे का, पेनकिलर्सचा ओव्हरडोस जीवघेणा ठरू शकतो.
  • पेनकिलर्सच्या अधिक सेवनाने पचन बिघडते.
  • ब्लड प्रेशरची पातळी अनियंत्रित होऊ शकते.
  • अनेकदा ब्लड प्रेशर वाढल्याने हार्ट अॅटकचा धोका वाढतो.
  • अनेकांना पेनकिलर्सची सवय लागते.
  • कोकीन, अल्कोहोल यांसारख्या गोष्टी घेण्याची शक्यता वाढते. 
  • पेनकिलर्सचे अधिक सेवन करणाऱ्यांना लोकांना कालांतराने पेनकिलर्सचा काहीच असर होत नाही.