या '5' कारणांंसाठी जेवणासोबत पाणी पिण्याची सवय टाळाच

जेवणासोबत अनेकांना पाण्याचा ग्लास सोबत ठेवण्याची सवय असते.

Dipali Nevarekar Dipali Nevarekar | Updated: Feb 6, 2018, 08:28 PM IST
या '5' कारणांंसाठी जेवणासोबत पाणी पिण्याची सवय टाळाच  title=

मुंबई : जेवणासोबत अनेकांना पाण्याचा ग्लास सोबत ठेवण्याची सवय असते.

जेवताना पाणी पिणे हे काहींना अगदी गरजेचे वाटते. पण जेवताना पाणी पिणे ही नकळत जडलेली सवय असली तरीही यामुळे तुमचे आरोग्य  धोक्यात येऊ  शकते.  उभ्याने पाणी प्यायल्याने  बेकार होऊ शकते किडनी

गॅस्ट्रिक ज्युसचा नाश होतो

खाल्लेल्या अन्नाचे व्यवस्थित पचन करून शरीराला उर्जा पुरवण्याचे प्रमुख पोटातील एंजाईम्स करत असतात. पण जेव्हा हा रस पाण्यात विरघळून जातो  तेव्हा पचनक्रियेसोबतच आतड्यांमध्ये क्रॅम्स येणे, दुखणे अशा समस्या अधिक उद्भवतात. यामुळे सारी पचनक्रिया संथ होते आणि बराच वेळ अन्न पोटात साचून राहिल्याने छोट्या आतड्याचे कार्यदेखील रेंगाळते. परिणामी शरीराला अन्नातून आवश्यक पोषणद्रव्यं  मिळत  नाहीत.

लाळनिर्मिती कमी होते

पचनक्रियेची सुरूवात ‘लाळे’तूनच होते. त्यातील एन्जाईम्स अन्नपदार्थांचे विघटन करण्यास मदत करतात त्याचबरोबर पोटातील डायजेस्टिव्ह एन्जाईम्सना चालना देऊन पचनक्रिया सुधारण्यास मदत  करतात. पण जर तुम्ही जेवताना पाणी सतत प्यायल्यास लाळ  पाण्यामध्ये विरघळते. यामुळे तोंडात अन्नाचे विघटनही होण्याची प्रक्रिया कमी होते  तसेच  पचनक्रियादेखील मंदावते.

पित्त वाढते 

जर तुम्हांला सतत पित्ताचा त्रास होत असेल तर जेवताना पाणी पिण्याची सवय हेदेखील यामागील एक कारण असू शकते. जेवताना पाणी प्यायल्याने पचनक्रिया मंदावते. परिणामी त्याचे आरोग्यावर दुष्परिणाम होतात. पोटात काही विशिष्ट मर्यादेपर्यंतच पाणी शोषून घेतले जाते. त्यानंतर पाणी पोटातील गॅस्ट्रिक अ‍ॅसिडचेही विघटन करते. यामुळे डायजेस्टिव्ह एंन्जाईम्सदेखील कमी प्रमाणात  शोषली जातात. त्यामुळे पित्त वाढणे, छातीत जळजळ वाढणे  अशा समस्या वाढतात. 

रक्तातील साखरेचे प्रमाण वाढवते 

जेवताना पाणी प्यायल्याने ब्लड शुगरचे प्रमाण वाढू शकते.कारण जेव्हा खाल्लेल्या अन्नपदार्थांचे नीट पचन होत नाही तेव्हा त्याचे ग्लुकोजमध्ये रुपांतर होऊन शरीरात काही घटक मेदाच्या स्वरूपातच शरीरात साठून राहतात. परिणामी रक्तातील साखरदेखील वाढते.

वजन वाढते 

जेवताना पाणी प्यायल्याने तुमचे वजन वाढण्याची शक्यता देखील अधिक असते.  रक्तातील वाढलेले साखरेचे प्रमाण तसेच अन्नपदार्थांचे पुरेसे विघटन न झाल्याने शरीरात अतिरिक्त फॅट(मेद)  साचून राहते. आयुर्वेदानुसार लठ्ठ्पणा वाढण्याचे प्रमुख कारण म्हणजे दुबळी ‘डायजेस्टिव्ह फायर’.  यामुळे शरीरातील वात, कफ, पित्त यांचा समतोल ढासळतो. तसेच आरोग्यदेखील बिघडते.