या ४ स्मार्ट टिप्सने करा पाठदुखी दूर!

आपली जीवनशैली अतिशय धकाधकीची, गुंतागुंतीची आणि बैठी आहे.

Updated: Apr 21, 2018, 01:12 PM IST
या ४ स्मार्ट टिप्सने करा पाठदुखी दूर! title=

मुंबई : आपली जीवनशैली अतिशय धकाधकीची, गुंतागुंतीची आणि बैठी आहे. त्यामुळे अनेक लाईफस्टाईल डिसओर्डर्स उद्भवतात. त्यापैकी एक म्हणजे पाठदुखी. अनेक लोक या समस्येने ग्रासले आहेत. अनेकदा चुकीच्या पोश्चरमुळे अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. पण या काही चुकीच्या सवयी बदल्यास ही समस्या आपण दूर करु शकतो. काही खास टिप्स ज्यामुळे पाठ सरळ ठेवून तुम्ही तुमची पोश्चर सुधारू शकता... तुम्ही ट्राय करुन पहा या टिप्स...

एक्सरसाईज करा

तुमच्या धावपळीच्या दिनचर्येतून वेळ काढून एक्सरसाईज करा. दररोज १०-२० मिनिटे तरी स्वतःसाठी अवश्य काढा. ऑफिसमध्ये बैठे काम करणाऱ्यांनी न चूकता पाठ, मान आणि खांद्यांचे व्यायाम करावेत.

वर्किंग डेस्क रिअरेंज करा

जर कंप्म्युटरवर खूप वेळ काम करत असाल तर कामाची जागा म्हणजेच तुमचा वर्किंग डेस्क नीट सुस्थितीत ठेवणे गरजेचे आहे. तुमची बसण्याची स्थिती योग्य ठेवण्यासाठी डेस्क आणि खुर्चीतील अंतर योग्य असणे गरजेचे आहे.

फोनचा योग्य वापर

कामाच्या गडबडीत आपण आपल्या बसण्याच्या स्थितीकडे नीट लक्ष देत नाही. तासंतास आपण चुकीच्या स्थितीत बसून राहतो. त्याचा परिणाम म्हणजे पाठदुखी, कंबरदुखी, मानदुखी यांसारख्या समस्या उद्भवतात. त्यामुळे बसण्याची स्थिती योग्य राखण्यासाठी फोन तुमच्या समोर ठेवा आणि लॅपटॉप काहीसा उजवीकडे टेबलावर ठेवा.

पोश्चर सुधारा

पाठ ताठ ठेवून काम करण्याची स्वतःला आठवण करुन द्या. इतकंच नाही तर ड्रायव्हिंग करताना किंवा झोपतानाही तुमचं पोश्चर सुधारा.