Sperm Count Declines : महिलांचं आरोग्य (Women health), महिलांची शारीरिक क्षमता आणि बऱ्याच मुद्द्यांवर सातत्यानं चर्चा केली जाते. पण, पुरुषांच्या आरोग्याबाबतही (Mens health) बोलणं तितकंच महत्त्वाचं आहे. किंबहुना सध्या हा मुद्दा प्रकर्षानं पुढे येऊ लागला आहे. कारण ठरतंय ते म्हणजे नुकताच समोर आलेला एक अहवाल. या अहवालातून पुरुषांच्या आरोग्यासंदर्भातील महत्त्वाची आकडेवारी समोर आली आणि संपूर्ण जगभरातील पुरुषांपुढे मोठा प्रश्नच उभा राहिला. (Tension Arises as Sperm counts are decreasing worldwide know the reason behind that)
ह्युमन रिप्रॉडक्शन अपडेट जर्नलकडून करण्यात आलेल्या एका निरीक्षणपर अभ्यासातून समोर आलेल्या माहितीनुसार 1970 पासून जागतिक स्तरावर शुक्राणूंची संख्या (sperm count decline worldwide) निम्म्याहूनही कमी झाली आहे. 1973 ते 2000 दरम्यानच्या काळात Sperm Count 1.2% नं खाली उतरला होता. हे प्रमाण फात जास्त आहे असं अभ्यासकांचं मत. 2000 ते 2018 पर्यंत हाच आकडा 2.6% प्रती वर्ष इतक्या मोठ्या फरकानं आणि वेगानं वाढला.
शुक्राणू संख्या आणि एकूण केंद्रीकरणामध्ये झालेली घट पाहता, या साऱ्याचे फक्त पुरुषांच्या प्रजनन क्षमतेवरच नाही तर त्यांच्या आरोग्यावरही परिणाम होतात. बदलती जीवनशैली, प्रदुषणाचा मारा आणि तत्सम शक्यतांमुळे पुरुषांमध्ये असणाऱ्या प्रजनन क्षमतेमध्ये हे बदल होताना दिसत आहेत.
मागील काही वर्षांमध्ये भारतातही शुक्राणूंची घट दिसून आल्याचं इस्रायसलमधील हिब्रू विद्यापीठाचे प्राध्यापक हागेई लेव्हिन यांनी स्पष्ट केलं. गेल्या 46 वर्षांमध्ये ही घट साधारण 50 टक्क्यांहूनही अधिक असल्याचं म्हणत अलीकडल्या दिवसांमध्ये तिच्यामध्ये झपाट्यानं वाढ झाल्याचंही ते म्हणाले. शिवाय सदर बदल आणि त्याचे परिणाम पाहता आरोग्यासाठी धोकादायक असणारे घटक कमी करण्यासाठी जागतिक स्तरावर प्रयत्न केले गेले पाहिजेत असाही सूर त्यांनी आळवला.