Viral Video : 'पळणार्‍या लिंबा'च्या व्हायरल व्हिडिओमागे नेटकरीही धावले !

लिंबाचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत हे तुम्हांला ठाऊक असेल. 

Updated: Jul 16, 2018, 12:33 PM IST
Viral Video : 'पळणार्‍या लिंबा'च्या व्हायरल व्हिडिओमागे नेटकरीही धावले !  title=

मुंबई : लिंबाचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत हे तुम्हांला ठाऊक असेल. सकाळी लिंबू पाणी आणि मधाच्या सेवनाने सुरूवात केली तर विषारी घटक बाहेर पडण्यास मदत होते. पण कोणासाठी लिंबू हा प्रेरणादायी ठरू शकतो हे तुम्हांला ठाऊक आहे का? अमेरिकेत एका लिंबामुळे माईक साकासेगावाला धावण्याची प्रेरणा मिळाली. अवघ्या 1 मिनिट 51 सेकंदाच्या लिंबाच्या व्हिडिओने जगभरातील लोकांना प्रेरणा दिली आहे. ट्विटरवरही हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. 

अर्धा किलोमीटर धावला लिंबू 

कॅलिफोर्नियातील माईक साकासेगावाने रस्त्यामध्ये लिंबू पाहिला. मॉनिंग वॉकला बाहेर पडलेल्या माईकने त्या लिंबासोबत पळायला सुरूवात केली. सोबतच हे व्हिडिओमध्येही कैद केले. रस्त्याच्या बाजूला पडलेला लिंबू पाहून तो त्याला ढकलत ढकलतच पुढे धावायला लागला. 

 

माईकने शेअर केला व्हिडिओ 

रस्त्यातील सारे खाचखळगे पार करत लिंबू तब्बल  अर्धा किलोमीटर धावला आहे. लिंबाचा प्रवासाच्या व्हिडिओला पाच दिवसात सुमारे 90 लाख
व्ह्युज मिळाले आहेत. लाखभराहून अधिक लोकांनी या व्हिडिओला रिट्विटदेखील केलं आहे. 

लिंबू देतोय प्रेरणा 

 

ट्विटरवर अनेक फीटनेस फ्रीक लोकांना एक लिंबू प्रेरणा देत आहे. कॅटी मलिंग या युजरने लिहेलेल्या पोस्टनुसार, एक लहानसा लिंबू सगळे अडथळे पार करत धावू शकतो तर आपणही करूच शकतो. 

लिंबाला आणलं घरात 

 

व्हिडिओ पोस्ट करणार्‍या माईक साकासेगावाने लिंबू जेव्हा पळत पळत गटारात जात होता तेव्हा त्याने लिंबाला घरी आणून साफ करून ठेवल्याचेही सांगितले आहे. या व्हिडिओने तुम्हांलाही प्रेरणा दिली असेल तर सकाळी लवकर उठण्यासाठी मदत करतील या खास टीप्स