तुरुंगातील कैद्याने पोटात लपवला होता मोबाईल

त्या कैद्याला सतत पोटात दुखत असल्याची तक्रार जाणवत होती.

Updated: Sep 11, 2021, 07:15 AM IST
तुरुंगातील कैद्याने पोटात लपवला होता मोबाईल title=

मुंबई : तुरुंगात लपून मोबाईल नेणाऱ्या कैद्यांचे अनेक किस्से आतापर्यंत तुम्ही ऐकले असतील. पण आज आम्ही तुम्हाला अशा कैद्याबद्दल सांगणार आहोत, ज्याने जेलच्या आत मोबाईल नेला, पण नंतर तोही त्याच्या त्रासाचं कारण बनला. हे संपूर्ण प्रकरण कोसोवो इथली आहे. या ठिकाणी त्या कैद्याला सतत पोटात दुखत असल्याची तक्रार जाणवत होती.

रिपोर्ट बघून डॉक्टरही चक्रावले

सतत पोटदुखीची तक्रार करत असल्याने तुरुंग प्रशासनाला वाटलं की तो नाटक करत आहे. परंतु जेव्हा त्याची स्थिती समजली तेव्हा त्याला प्रिस्टीनाच्या गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आलं. येथे डॉक्टरांनी थोडी तपासणी केल्यानंतर कैद्याचा एक्स-रे केला, जे पाहून डॉक्टरंही हैराण झालेत. 

या कैद्याच्या एक्स-रे रिपोर्टमध्ये डॉक्टरांना मोबाईल सारखी गोष्ट दिसून आली. जेव्हा कैद्याला त्याबद्दल विचारण्यात आलं तेव्हा त्याने सांगितलं की, त्याने काही दिवसांपूर्वी मोबाईल फोन गिळला होता, त्यानंतर त्याला पोटात वेदना जाणवू लागल्या.

ऑपरेशननंतर, फोन 3 तुकड्यांमध्ये काढला गेला

यानंतर, डॉक्टरांनी या 33 वर्षीय कैद्याचं ऑपरेशन करून मोबाईल फोन बाहेर काढण्याचा निर्णय घेतला. कैद्याचं ऑपरेशन करणाऱ्या संघाचे नेतृत्व करणारे डॉ स्केंडर तेलकु म्हणाले, “एंडोस्कोपिक शस्त्रक्रियेद्वारे आम्ही फोन काढला, तीन तुकड्यांमध्ये हा फोन बाहेर काढण्यात आला. यास सुमारे 2 तास लागले, त्यानंतर कैद्याला पोटदुखीच्या समस्येपासून आराम मिळालाय. यानंतर, कैदीने डॉक्टरांना सांगितलं की, फोन 4 दिवस त्याच्या पोटात आहे. हे ऐकून डॉक्टरांना आश्चर्य वाटलं.

डॉक्टरांना बॅटरी लीक होण्याची भीती आहे

डॉक्टर तेलकु म्हणाले, 'आम्हाला सर्वात जास्त काळजी होती ती फोनच्या बॅटरीतीली अॅसिड त्याच्या पोटात लीक झालं असते.' मात्र सर्वकाही सुरळीत पार पडले आणि आम्ही मोबाईलचे सर्व भाग बाहेर काढू शकलो. उपचारानंतर पोलिसांनी कैदी आणि मोबाईल फोन दोघांनाही सोबत घेऊन गेली. मोबाईल फोन 2000 च्या दशकातील एक मॉडेल होतं