मुंबई : शरीरात रक्ताची कमतरता असेल तर अनेक आजारांना निमंत्रण मिळते. रक्ताच्या कमतरतेमुळे थकवा जाणवतो हाडे कमकुवत होतात. शरीरातील रक्ताची कमतरता वाढवण्यावसाठी पाच फळांचे सेवन उपयोगी ठरते.
शरीरात रक्ताची कमतरता भरुन काढण्यासाठी डाळिंब खाणे चांगले. हे फळ स्वादिष्ट तर असतेच मात्र त्यासोबतच यात कॅल्शियम, सोडियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम, लोह आणि व्हिटामिन्स असतात.
दररोज एक सफरचंद खाल्ल्याने आजार दूर होतात असं म्हटलं जात. आजार दूर ठेवण्यासोबतच सफरचंद खाल्ल्याने शरीरातील रक्ताची कमतरता भरुन निघते. सफरचंद खाल्ल्याने शरीरातील हिमोग्लोबिन वाढते.
रक्ताची कमतरता दूर करण्यासाठी बीटाचा वापर फायदेशीर ठरतो. दररोज बीटाचे सेवन केल्यास शरीरातील रक्ताचे प्रमाण वाढते. तसेच बीट आणि डाळिंबाचा रस प्यायल्यानेही फायदा होतो.
शरीरातील रक्ताची कमतरता भरुन काढण्यासाठी द्राक्षेही उपयुक्त ठरतात. द्राक्षांमध्ये व्हिटामिन, पोटॅशियम, कॅल्शियम, आर्यनसारखी तत्वे असतात. रक्ताची कमतरता असेल तर द्राक्षे खाल्ली पाहिजेत.
फळांशिवाय गाजर ही फळभाजीही रक्त वाढवण्याचे काम करते. चांगल्या आरोग्यासाठी गाजराचे सेवन फायदेशीर ठरते.