केळ हे असं फळ आहे, जे प्रत्येक ऋतूमध्ये सहज उपलब्ध असतं. शिवाय सगळ्यात स्वस्त आणि उर्जेने समृद्ध असलेले हे फळ भूक कमी करण्यास आणि वजन वाढविण्यात खूप जास्त फायदेशीर मानलं जातं. हे खाल्ल्याने पोट सहज भरते आणि शरीराला त्वरित ऊर्जा मिळतं हे आपल्याला माहितीये. बरेच लोकांना सकाळी रिकाम्या पोटी फळं खायची सवय असते. त्यातील एक फळ आहे केळ. पण तुम्हाला माहितीये रिकाम्या पोटी दुधासोबत केळी खाणे आपल्या शरीराला मोठं नुकसान होतं, असं तज्ज्ञ सांगतात. कोणत्या लोकांसाठी हे रिकाम्या पोटी केळी खाल्ल्यास नुकसान होतं पाहूयात. (These people should not eat bananas in the morning on an empty stomach Know the right time and method)
केळी हे फायदेशीर असले तरी काहींना सकाळी रिकाम्या पोटी यांचं सेवन केल्यास अनेक समस्या निर्माण होतात. या लोकांना गॅस आणि ॲसिडिटीची समस्या उद्भवू शकते. त्यामुळे रिकाम्यापोटी नाश्त्यात केळी खाण्यासोबत काहीतरी सोबत खावं. कारण केळ्यामध्ये अनेक कार्बोहायड्रेट्स आढळतात, ज्यामुळे पचनामध्ये समस्या निर्माण होतात. कधीकधी रिकाम्या पोटी याचं सेवन केल्याने पोट खराब होणे, उलट्या होणे किंवा इतर समस्या तुम्हाला होऊ शकतात. त्यामुळे केळी नेहमी इतर पदार्थांसोबत खावी. फक्त केळी खाणे तुमच्यासाठी नुकसानदायक ठरु शकतं.
सकाळी रिकाम्या पोटी केळीचे सेवन केल्यास वजन वाढण्यास मदत होते. केळीमध्ये कार्बोहायड्रेट्स आणि कॅलरीज खूप जास्त असतात. जर तुम्ही मध्यम आकाराचे केळ खाल्ल्यास तर तुम्हाला सुमारे 25-30 ग्रॅम कार्बोहायड्रेट्स आणि 90-105 कॅलरीज मिळतात. त्यामुळे जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर केळी खाणे टाळा.
खरंत तज्ज्ञ सांगतात केळी खाण्यासाठी दिवसातून सेवन करणे चांगलं आहे. दिवसा केळी खाल्ल्याने तुमच्या शरीराला ऊर्जा मिळते. पोटही बराच काळ भरलेले राहते. याशिवाय दुपारी किंवा संध्याकाळी केळी तुम्ही खाऊ शकता.
(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)
नेहा चौधरी या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर (वरिष्ठ उपसंपादक) पदावर कार्यरत आहे. त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 20 वर्षांचा अनुभव आहे. इलेक्ट्रॉनिक आणि ऑनलाइन मीडियामध्ये प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांनी पत्रकाराची सुरुवात रिपोर्टर म्हणून देशोन्नती वृत्तपत्रातून केली. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत बातम्यांचा आढावा त्यांनी घेतला. 2006 मधील मुंबई लोकल ट्रेन बॉम्बस्फोट हल्ला, 26/11 मुंबई हल्ला, प्रमोद महाजन हत्या अशा अनेक घटनांचे कव्हरेज त्यांनी केलं आहे. त्यानंतर ई टीव्ही मराठीमध्येही रिपोर्टर म्हणून काम केलं. त्यानंतर मी मराठी, साम मराठी, जय महाराष्ट्र, न्यूज 18 लोकमतमध्ये अनेक वर्ष त्यांनी आऊटपूटमध्ये रनडाउन प्रोड्यूसर म्हणून काम केलं. आता त्या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये कार्यरत आहेत. इथे त्या राजकारण, गुन्हेगारीपासून मनोरंजनापर्यंत ग्रामीण भागातील बातम्यांमध्ये आपलं योगदान देतात. त्यासोबत सोशल मीडियावरील व्हायरल आणि ट्रेंडिंगवरही त्या लिखाण करतात. तर आरोग्य, लाइफस्टाइल या बातम्यांमध्ये विशेष रुची आहे. तर गेल्या 2 वर्षांपासून त्यांनी ज्योतिष आणि धर्म यावर काम करत आहेत. त्यांनी हस्तरेषाशास्त्र, वास्तु आणि फेंगशुईसह वैदिक ज्योतिष, अंकशास्त्र आणि टॅरोचाही पुस्तकाच वाचन आणि तज्ज्ञांनी बोलून लोकांना माहितीपूर्ण बातम्या देतात. सण, उत्सवाचे धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व याची त्या त्यांचा बातम्यांमधून समतोल राखतात. त्यांच्या मोकळ्या वेळेत त्यांना धार्मिक ग्रंथांच वाचन तसंच प्रवास, संगीताची आवड आहे.
...Read More|
RCB
(20 ov) 240/4
|
VS |
MI
222/5(20 ov)
|
| Royal Challengers Bengaluru beat Mumbai Indians by 18 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
LSG
(20 ov) 164/8
|
VS |
GT
165/3(18.4 ov)
|
| Gujarat Titans beat Lucknow Super Giants by 7 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
NAM
(49 ov) 198
|
VS |
SCO
199/3(38 ov)
|
| Scotland beat Namibia by 7 wickets | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.