मित्र-मैत्रिणींशिवाय असा दूर करा एकटेपणा....

प्रत्येक व्यक्तीमध्ये मानसिक चढउतार होत असतात.

Updated: May 12, 2018, 10:25 AM IST
मित्र-मैत्रिणींशिवाय असा दूर करा एकटेपणा.... title=

मुंबई : प्रत्येक व्यक्तीमध्ये मानसिक चढउतार होत असतात. अनेकदा एकटे वाटते. आतून रिकामेपण जाणवते. अधिक मित्र-मैत्रिणी नसलेल्या लोकांना ही जाणीव खूप होते. किंवा एखादे नाते तुटले, मैत्री भंगली, दगा बसला किंवा विश्वासघात झाला की अनेकदा एकटेपणा जाणवू लागतो. मग एकटेपणाच्या त्या कोशातून बाहेर पडणे फार अवघड होऊन बसते. मग पटकन कोणाशी मैत्री होत नाही, सहज विश्वास बसत नाही. अशा परिस्थितीत आपले एकटेपणा अधिक जाणवू लागतो. पण यावरही उपाय आहे. तुम्हालाही एकटेपणा सतावत असेल तर हे उपाय नक्की करुन पहा....

सोलो ट्रिप

सोलो ट्रिप म्हणजे एकट्याने प्रवास करणे, फिरणे. एकट्याने प्रवास करण्याचे अनेक फायदे आहेत. एकट्याने प्रवास केल्याने तुमचे विचार, इच्छा याबद्दल तुम्ही अधिक इमानदार आणि पारदर्शी राहता. तुम्हाला तुमची नव्याने ओळख होते. आत्मविश्वास वाढतो. जाणीवा अधिक प्रगल्भ होतात.

काहीतरी नवे शिका

काहीतरी नवे शिकल्याने मन त्यात गुंतेल, रमेल. त्यामुळे वेळेचा सदुपयोग तर होईलच पण एकटेपणाही दूर होईल.

पुस्तक वाचा

पुस्तकांचा सारखा प्रामाणिक मित्र नाही. त्यामुळे तुमच्या इतर सवयींमध्ये पुस्तक वाचण्याचीही सवय लावून घ्या. रोज काहीतरी नवे वाचण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे मेंदुला वैचारिक खाद्य मिळेल. 

सिनेमे पहा

तुमच्या आवडीचे, आवडीच्या विषयांवरील नवनवे सिनेमे पहा. टी.व्ही. सिरीज किंवा आवडत्या मालिका तुम्ही पाहु शकता. त्यामुळे एकटेपणाची जाणीव कमी होण्यास नक्कीच मदत होईल.