या टीप्सने सकाळी लवकर उठण्याचा संकल्प होईल पूर्ण

‘लवकर निजे,लवकर उठे त्याला आयु-आरोग्य लाभे.’ ही म्हण आपण अगदी आपल्या लहानपणापासुन ऐकत आलो आहे. मात्र लवकर जाग येत नाही म्हणून किंवा आळसामुळे आज आपण सुर्योद्यापूर्वी उठणे हे जवळजवळ विसरुनच गेलो आहोत. 

Updated: Feb 5, 2018, 07:50 PM IST
या टीप्सने सकाळी लवकर उठण्याचा संकल्प होईल पूर्ण   title=

मुंबई : ‘लवकर निजे,लवकर उठे त्याला आयु-आरोग्य लाभे.’ ही म्हण आपण अगदी आपल्या लहानपणापासुन ऐकत आलो आहे. मात्र लवकर जाग येत नाही म्हणून किंवा आळसामुळे आज आपण सुर्योद्यापूर्वी उठणे हे जवळजवळ विसरुनच गेलो आहोत. 

सकाळी लवकर उठल्याने दिवसभरातील कामे वेळेत होतात व कामाचा ताण कमी होतो.कामे घाईघाईत करण्याचे किंवा टाळण्याचे प्रमाण कमी होते. सहाजिकच आपला संपुर्ण दिवस फ्रेश जातो.

सकाळी लवकर जाग येण्यासाठी काही महत्वाच्या टिप्स-

रात्री वेळेत झोपा-

इतर कामापेक्षा पुरेश्या झोपेला प्रथम प्राधान्य द्या.यासाठी रात्री ठरवून वेळेवर झोपा व सकाळी लवकर उठा.

उशीरा झोपण्याची सवय बदला-

रात्री उशीरा झोपल्याने दुस-या दिवशी सकाळी लवकर उठणे तुम्हाला शक्य होत नाही.मग या गोष्टीची तुम्हाला सवयच लागते.सर्वप्रथम ही सवय बदला.रात्री झोप येत नसेल तर रात्री एक ग्लास कोमट दूध घ्या. शतपावली करा.ज्यामुळे तुम्ही लवकर झोपू शकाल.

प्रयत्न सोडू नका-

जर तुम्ही ठरवल्याप्रमाणे तुम्हाला सकाळी जाग आली नाही तर लगेच धीर सोडू नका.तुमच्या शरीराला उशीरा उठण्याची सवय लागली आहे ही सवय मोडायला थोडा वेळ लागेल.जरी पहिल्या दिवशी तुम्हाला वेळेत जाग आली नाही तरी आठवडाभर प्रयत्न केल्यास तुम्हाला लवकर उठण्याची सवय लागेल.

आधी छोटे ध्येय गाठण्याचा प्रयत्न करा-

सकाळी लवकर उठण्याचा प्रयत्न करण्यासाठी आधी छोटे-छोटे ध्येय गाठण्याचा प्रयत्न करा.म्हणजे पहिल्या दिवशी नेहमीच्या वेळेच्या १५ मिनीटे आधी झोपा व दुस-या दिवशी १५ मिनीटे लवकर उठण्याचा प्रयत्न करा. मग दुस-या दिवसापासुन ३० मिनीटे आधी झोपा व ३० मिनीटे लवकर उठण्याचा प्रयत्न करा.अशा रितीने तुम्ही तुमच्या ठरलेल्या वेळी सकाळी लवकर उठण्यात यश मिळवू शकता. 

दुपारी झोप घेण्याचे टाळा-

कधीही दुपारी झोपू नका. कारण दुपारी झोपल्याने रात्री लवकर झोप लागत नाही व त्यामुळे पुन्हा सकाळी लवकर जाग येत नाही. दुपारची झोप टाळण्यासाठी स्वत:ला इतर गोष्टी किंवा तुमच्या आवडीच्या छंदामध्ये मध्ये गुंतवा.

झोपण्यापूर्वी वातावरण निर्मिती करा-

पुस्तके वाचा किंवा सुवासिक चहा घ्या.किंवा ज्यामुळे तुम्हाला शांतता मिळेल अशी एखादी गोष्ट ठरवून रोज रात्री करा.ज्यामुळे ती गोष्ट केल्यावर तुमच्या शरीराला झोपण्याची वेळ झाली असे वाटेल. झोप येण्यासाठी तुमच्या बेडरुममधील वातावर स्वच्छ, नीटनेटके, आनंदी व झोपेसाठी पुरक असे ठेवा. 

आठवडाभराच्या कामाचे नियोजन करा-

आठवडाभरात तुम्ही जी कामे करणार आहात त्याचे आधीच नियोजन करा.रोजच्या कामामध्ये तुम्हाला उत्साहीत करणारी कामे सकाळी सकाळसाठी ठरवा. जसे की मित्राला फोन करणे किंवा एख्याद्या नविन जागी भेट देणे ज्यामुळे तुम्हाला सकाळी उठण्यासाठी प्रोत्साहन मिळेल.