These Dal is Not Good For Uric Acid : शरीरात यूरिक अॅसिडचे प्रमाण वाढल्यास तुम्हाला संधीवाताचा त्रास होतो. ज्या लोकांना युरिक अॅसिडचा त्रास असेल त्यांना आहारावर खूप लक्ष द्यावे लागते. या लोकांनी चुकूनही काही डाळींचं सेवन करुन नयेत असं आहार तज्ज्ञ सांगतात. खास करून या लोकांनी मसूर डाळ खाऊ नयेत. मसूरमध्ये प्रथिने आणि प्युरिन भरपूर प्रमाणात असतं. त्यामुळे मसूर रुग्णांसाठी धोकादायक ठरू शकतात. प्युरीनयुक्त पदार्थ खाल्ल्याने शरीरातील युरिक ॲसिड वाढतं. त्यामुळे या डाळी ताबडतोब आपल्या आहारातून काढून टाकाव्यात.
काळी उडीद डाळ : काळ्या उडदाच्या डाळीमध्ये प्रथिने आणि प्युरीन मुबलक प्रमाणात असतं जे यूरिक ऍसिडच्या रुग्णांसाठी नुकसानदायक असतं. त्यामुळे जर तुम्हाला युरिक ॲसिडचा त्रास होत असेल तर ही डाळ खाऊ नका. तसंच इडली किंवा डोसा खाल्ल्यास खाऊ नका कारण त्यात काळ्या उडीदचाही वापर केला जातो.
मसूर डाळ : मसूर डाळीमध्ये प्युरीनचे प्रमाण इतर डाळींच्या तुलनेत जास्त असतं. कारण प्रथिने आणि इतर पोषक तत्वांचा हा एक चांगला स्रोत आहे. मात्र युरिक अॅसिडच्या समस्येने त्रस्त असलेल्यांनी याचं सेवन करु नका.
अरहर डाळ : युरिक ॲसिडचे प्रमाण जास्त असलेल्या रुग्णांनी अरहर डाळ मर्यादित प्रमाणात किंवा अजिबात खाऊ नये. प्युरीन आणि प्रथिने मोठ्या प्रमाणात असल्याने या डाळीचे सेवन केल्याने युरिक ऍसिडची समस्या अधिक वेगाने वाढण्याची भीती असते.
सोयाबीन : प्रथिने समृद्ध असलेले सोयाबीनचे सेवन केल्याने अनेक आरोग्यदायी फायदे होतात. मात्र नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिनच्या संशोधनातून असं दिसून आलंय की सोया किंवा सोया प्रथिने सीरम यूरिक अॅसिड वेगाने वाढतं. त्याच वेळी टोफू आणि बीन दही केक यूरिक अॅसिडमध्ये फायदेशीर आहे.
चवळी : ज्या लोकांना युरिक अॅसिडचे प्रमाण वाढले आहे त्यांनी चवळीचे सेवन टाळावे कारण त्यात भरपूर प्युरिन असतात.
चणा डाळ : हरभरा डाळीमध्ये असलेले प्रथिने शरीरातील कमकुवतपणा दूर करतात आणि हाडे मजबूत करतात. पण जर तुम्ही युरिक अॅसिडचे रुग्ण असाल तर ही डाळ तुमच्यासाठी विषाच काम करते.
(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)
IND
(62.1 ov) 192 (112.3 ov) 387
|
VS |
ENG
00(0 ov) 387(119.2 ov)
|
Full Scorecard → |
WI
225(70.3 ov)
|
VS |
AUS
16/1(9 ov)
|
Full Scorecard → |
BRN
(19 ov) 89
|
VS |
TAN
90/0(10.1 ov)
|
Tanzania beat Bahrain by 10 wickets | ||
Full Scorecard → |
GER
(20 ov) 219/7
|
VS |
MAW
182/7(20 ov)
|
Germany beat Malawi by 37 runs | ||
Full Scorecard → |
GER
(18.4 ov) 140
|
VS |
TAN
146/5(16.5 ov)
|
Tanzania beat Germany by 5 wickets | ||
Full Scorecard → |
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.