किडनीचे आरोग्य चांगले राखण्यासाठी एक महत्त्वाचा गोष्ट म्हणजे सोडियम, फॉस्फरस आणि पोटॅशियमचे प्रमाण कमी असलेल्या संतुलित आहाराचे सेवन करणे. या खनिजांच्या अतिसेवनामुळे मूत्रपिंडावर अतिरिक्त ताण पडू शकतो, ज्यामुळे गुंतागुंत वाढू शकते. याव्यतिरिक्त, उच्च-प्रथिनयुक्त आहार मूत्रपिंडावरील ताण वाढन मूत्रपिंडाचे आजार बळावतात. आहारात भरपूर ताजी फळे आणि भाज्यांचा समावेश करणे महत्त्वाचे आहे कारण ते किडनीच्या कार्यास आवश्यक आहे ते पोषक आणि अँटिऑक्सिडंट्सने समृद्ध असतात.
मुंबईतील आहारतज्ज्ञ जिनल पटेल यांच्या सांगण्यानुसार, फळं, भाज्या, तृणधान्य आणि प्रथिने यांसारख्या पौष्टिक पदार्थांचा समावेश करून, रुग्ण त्यांचा रक्तदाब नियंत्रित करू शकतात आणि वजन निरोगी राखू शकतात. याव्यतिरिक्त, संतुलित आहार सोडियम, पोटॅशियम आणि फॉस्फरसचे सेवन मर्यादित करून मूत्रपिंडावरील ताण कमी करू शकतो जे किडनीच्या कार्यावर नकारात्मक परिणाम करतात.
जीवनसत्त्वे आणि खनिजांनी समृध्द आहार केवळ संपूर्ण आरोग्यासाठीच नाही तर रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यातही मदत करते. किडनीच्या आजाराने ग्रस्त असलेल्या व्यक्तींच्या जीवनाचा दर्जा वाढवण्यात संतुलित आहार एक महत्त्वाची भूमिका बजावते.
जिनल पटेल म्हणतात, तुमच्या किडनीचे आरोग्य उत्तम राखण्यासाठी या पदार्थांचे सेवन करा: किडनीचे आरोग्य निरोगी राहण्यासाठी फळे आणि भाज्यांनी समृद्ध आहारावर लक्ष केंद्रित करा. गॅप३ (GAP3) फळे म्हणजे पेरु, सफरचंद, नासपती, पपई अननस या फळांमध्ये जे अँटिऑक्सिडंट असतात ते किडनीचे नुकसान होण्यापासून संरक्षण करण्यास मदत करतात. याव्यतिरिक्त पालेभाज्यांमधून देखील किडनीच्या आरोग्यास प्रोत्साहन देणारे लोह आणि व्हिटॅमिन के यासारखे आवश्यक पोषक घटक मिळतात.
तुमच्या आहारात मासे आणि टोफू सारख्या प्रथिनांचा समावेळ केल्यास किडनीचे कार्य सुरळीत राहते. याव्यतिरिक्त, ब्राऊन राईस आणि क्विनोआ सारख्या धान्यांमधीस उच्च फायबरमुळे संपूर्ण मूत्रपिंडाच्या आरोग्यास फायदे होतात जे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास मदत करतात. तुमच्या दैनंदिन आहारात या पदार्थांना प्राधान्य देऊन, तुम्ही तुमची किडनी उत्तम प्रकारे कार्यरत ठेवण्यासाठी सक्रिय पावले उचलू शकता. पौष्टिक आहाराचे पालन करणे जे किडनीच्या आरोग्यास फायदेशीर ठरते आणि त्यामुळे दीर्घकालीन नुकसान टाळता येते. वरील आहारासंबंधीत चांगल्या सवयींचे पालन केल्यास किडनीचे आरोग्य चांगले राहते. लक्षात ठेवा की आहारातील लहानसा बदल देखील तुमच्या किडनीच्या आरोग्यावर लक्षणीय परिणाम करू शकतो.