Weight Loss: बेली फॅट कमी करण्यासाठी 'या' 5 टिप्स ठरतील लाभदायक

आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीत प्रत्येकाचं आरोग्याकडे दुर्लक्ष होतं.  

Updated: Aug 23, 2022, 08:12 AM IST
Weight Loss: बेली फॅट कमी करण्यासाठी 'या' 5 टिप्स ठरतील लाभदायक  title=

मुंबई : आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीत प्रत्येकाचं आरोग्याकडे दुर्लक्ष होतं. सतत कंप्यूटर बसून काम केल्यामुळे शरीराची हालचाल होत नाही आणि यामुळे अनेक शारीरिक समस्या जाणवतात. त्यामधील एक म्हणजे बेली फॅट (Belly Fat). फक्त पुरुषच नाही तर महिला देखील बेली फॅटमुळे त्रस्त आहेत. बेली फॅट कमी करण्यासाठी अनेक उपाय आपण करतो. बेली फॅट कमी करणं खूप कठिण आहे. शरीराच्या इतर भागाचे वजन सहज कमी करता येतं पण बेली फॅट नाही, त्यामुळे काही उपाय केल्यामुळे बेली फॅट कमी करण्यास मदत होईल. जाणून घेवू बेली फॅट कमी करण्यासाठी काही खास टिप्स

मिठाई सोडा- बेली फॅट कमी करण्यासाठी सर्वप्रथम आहारातून मिठाई प्रमाण कमी करा. शरीरातील चरबी वाढण्याचे कारण इन्सुलिन आहे. तुम्ही जितके गोड खाल तेवढंच अधिक तुमच्या शरीरात इन्सुलिनचे प्रमाण वाढेल. 

फायबरचं प्रमाण - बेली फॅट कमी करण्यासाठी फायबरयुक्त पदार्थांचं सेवन करा. यामुळे वजन कमी होण्यास मदत होईल. फायबरमध्ये असे घटक असतात जे पाण्यात सहज विरघळतात. अन्न पचवण्यासाठी हे महत्त्वाचे आहे. फायबर युक्त अन्न खाल्ल्याने पोट दीर्घकाळ भरलेलं राहतं.

कॅलरीजची काळजी घ्या - जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर सर्वप्रथम तुमच्या आहारातील कॅलरीज लक्षात घ्या. तुमच्या आहारात अशा गोष्टींचा समावेश करा ज्यामध्ये कॅलरीज कमी असतील. यासाठी सकस आहार घ्या आणि कॅलरीजची काळजी घ्या.

भरपूर पाणी प्या - पाण्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. भरपूर पाणी प्यायल्यामुळे पचन क्रिया योग्यरित्या कार्य करते आणि शरीर हायड्रेटेड राहतं.  भरपूर पाणी प्यायल्याने पोट भरलेलं राहतं, त्यामुळे पुन्हा पुन्हा भूक लागत नाही. 

(Disclaimer: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अवलंबण्यापूर्वी, वैद्यकीय सल्ला जरूर घ्या. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)