वजन कमी करायचंय, आजपासूनचं आहारात 'या' गोष्टींचा समावेश करा

पोटाची ढेरी कमी करायचीय? या टिप्स वापरून पाहा 

Updated: Aug 29, 2022, 09:46 PM IST
वजन कमी करायचंय, आजपासूनचं आहारात 'या' गोष्टींचा समावेश करा  title=

मुंबई : धावत्या जीवनशैलित आजकाल वजन कमी करणे हे एक मोठे आव्हान आहे. कारण आजकाल बहुतेक लोक चुकीच्या आहार आणि जीवनशैलीमुळे लठ्ठ होत आहेत. वजन कमी करण्यासाठी अनेकजण तासनतास जिममध्ये घाम गाळतात, मात्र तरीही वजन कमी होत नाही. त्यामुळे आता आम्ही तुम्हाला काही घरगूती उपाय सांगणार आहोत. ज्याचे सेवन केल्याने तुमचं वजन कमी होईल.चला जाणून घ्या. 

पालक
पालक हे लोहाने समृद्ध मानले जाते. त्याच वेळी, त्यात कॅलरीजचे प्रमाण खूप कमी आहे, जे वजन कमी करण्यासाठी एक चांगला पर्याय आहे. एवढेच नाही तर पालक हे फायबर आणि जीवनसत्त्वे ए, सी आणि के यांचाही चांगला स्रोत आहे. अशा परिस्थितीत पालकाच्या सेवनाने वजन कमी होण्यास मदत होते, तसेच लोहाचे शोषण वाढते आणि त्वचा निरोगी आणि चमकदार राहते.

मशरूम
मशरूम तुमच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत. ज्यामुळे तुम्ही तुमचे वाढते वजन नियंत्रित करू शकता. मशरूममध्ये प्रथिने जास्त असतात ज्यामुळे चयापचय सुधारू शकतो. हे शरीरातील चरबी जाळण्यास व वजन कमी करण्यास मदत करते.

भोपळा
भोपळा फायबरने भरलेला असतो जो वजन नियंत्रणासाठी खूप चांगला सिद्ध होतो. तुम्ही भोपळ्याचे सेवन सूप, करी किंवा सॅलडच्या स्वरूपात करू शकता. वजन कमी करण्याची स्वादिष्ट रेसिपी बनवण्यासाठी तुम्ही इतर भाज्यांमध्ये भोपळा मिसळू शकता. वजन नियंत्रित ठेवण्यासोबतच शरीराला पूर्ण पोषण मिळू शकते.

 (Disclaimer : येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. कृपया या माहितीचा वापर करण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला घ्या. Zee 24 Tass या माहितीची खातरजमा करत नाही.)