सकाळी ब्रेकफास्ट न करता घराबाहेर पडता; आरोग्याला होणारे 'हे' 5 फायदे हिरावून घेताय!

Breakfast Skpping Side Effects: नाश्ता आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतो. एकदिवस जरी नाश्ता केला नाही तर आरोग्याचे काय नुकसान होते जाणून घ्या.

मानसी क्षीरसागर | Updated: May 20, 2024, 11:49 AM IST
सकाळी ब्रेकफास्ट न करता घराबाहेर पडता; आरोग्याला होणारे 'हे' 5 फायदे हिरावून घेताय! title=
breakfast is important for health never skip know the benefits of breakfast

Morning Breakfast Benefits: उत्तम आरोग्यासाठी न्याहारी खूप महत्त्वाची मानली जाते. सकाळचा ब्रेकफास्ट म्हणजेच नाश्ता केला नाही तर त्याचे दुष्परिणाम शरीराला भोगावे लागतात. हे माहिती असूनही अनेकजण दररोज नाश्ता करत  नाहीत. नाश्ता करणे का गरजेचे आहे याचा अर्थ ब्रेकफास्ट मध्येच लपला आहे. रात्रभराचा उपवास तोडल्यानंतर पौष्टिक आहार घेण्याचा सल्ला दिला जातो. कारण शरीर रात्रभरात भरपूर प्रोटीन, एनर्जी आणि कॅल्शियमचा उपयोग करते. अशातच सकाळी उठल्यानंतर प्रोटीन, ओमेगा 3 आणि फॅटी अॅसिड व व्हिटॅमिन बीसारख्या पोषक तत्वांनी भरपूर असलेले पदार्थ खाणे शरीरासाठी खूप फायदेशीर आहे. 

दिवसभर लागणारी शक्ती व उर्जा ही न्याहारीतून मिळते. सकाळचा नाश्ता हा खूप गरजेचा व लाभदायक असतो. सकाळी पोषणयुक्त नाश्ता केल्यास शरीरातील वाईट कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते.  त्यामुळं अगदी दररोज न चुकता नाश्ता करावा. दररोज नाश्ता केल्याचे काय फायदे होतात, हे जाणून घ्या. 

रोज ब्रेकफास्ट करण्याचे फायदे

ब्रेन पॉवर वाढते

नाश्ता केल्याने मेंदूची ताकद वाढवण्यास मदत मिळते. नाश्ता केल्याने मेंदूला ग्लुकोज मिळते. जे मेंदूसाठी खूप गरजेचे असते. यामुळं स्मरणशक्ती आणि एकाग्रता वाढते. 

मेटाबॉलिज्म बूस्ट होते

नाश्ता केल्याने मेटाबॉलिज्म म्हणजेच पचनक्रिया वाढते. त्यामुळं कॅलरी वेगाने घटण्यास मदत होते आणि वजन नियंत्रणात राहण्यास मदत मिळते. 

ब्लड शुगर नियंत्रणात राहते

सकाळी नाश्ता केल्यानंतर ब्लड शुगर नियंत्रणात राहते. त्यामुळं मधुमेहसारख्या आजारांचा धोका कमी होतो. 

मुड चांगला राहतो

सकाळचा नाश्ता केल्याने शरीरात एंडोर्फिन हार्मोनचा स्तर वाढतो. जे मूड चांगला ठेवण्यास मदत करते आणि तणाव कमी करता येतो. 

क्रेव्हिंग कंट्रोल होते

जे लोक नाश्ता करत नाहीत त्यांना काम करत असताना आणि दुपारी जेवणाच्या आधी भूक लागते. अशावेळी त्यांना बाहेरचं खाण्याची सवय लागते. अशावेळी एक चांगला संतुलित आहार घेतल्यास दीर्घकाळापर्यंत पोट भरलेले राहते आणि ओव्हरइंटिंगपासूनही बचाव होतो. 

नाश्ता कसा असावा?

सकाळचा नाश्ता हा सकस असावा, चहा-बिस्कीट, ब्रेड बटर असे पदार्थ नाश्तामध्ये खावू नका. पारंपारिक पदार्थ हे पौष्टिक असतात त्यामुळं सकाळी पोट भरतील असेच पदार्थ खा. जसं की, पोहे, उपमा, थालीपीठ, नाचणीचे आंबील, घावणे, अशा पदार्थांचा समावेश न्याहारीत करा. 

(Disclaimer: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. याचा वापर करण्यापूर्वी कृपया वैद्यकीय सल्ला घ्या. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)