Holi 2019 : रंगांमुळे त्वचेवर अॅलर्जी झाल्यास काय कराल?

रंगांमुळे होणारे साइड इफेक्ट्सही लपून राहत नाही.

Updated: Mar 21, 2019, 12:10 PM IST
Holi 2019 : रंगांमुळे त्वचेवर अॅलर्जी झाल्यास काय कराल? title=

मुंबई : देशभरात होळी, धुलिवंदनाचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. होळीचा सण म्हणलं की रंगांची उधळण आलीच. परंतु या रंगांमुळे होणारे साइड इफेक्ट्सही लपून राहत नाही. चेहऱ्याला रंग लावल्याने अनेकांना त्वचेवर जळजळ, लाल चट्टे, खाज, रॅशेज येतात. याव्यतिरिक्तही इतर काही अॅलर्जी झाल्यास काय कराल? जाणून घ्या रंगांमुळे चेहऱ्याला, त्वचेवर अॅलर्जी झाल्यास काय कराल...

पूर्वी होळी खेळण्यासाठी वापरले जाणारे रंग नैसर्गिक असायचे. हळद किंवा फुलांपासून रंग तयार केले जात होते. परंतु आता रासायनिक रंगांचा वापर केला जातो. हे रंग स्वस्तही असल्याचे त्याचा सर्रास वापर केला जातो. परंतु या रंगांमुळे त्वचेला मोठं नुकसान होतं. रासायनिक रंगांमुळे डोळ्यांना दुखापत तसंच केसांनाही हानी पोहचू शकते. 

होळी खेळण्याआधी चेहऱ्यावर चांगल्या प्रतीचे सनस्क्रीम किंवा तेल लावूनच बाहेर पडा. केसांनाही केल लावा. हात आणि पायांच्या नखांना नेलपॉलिश लावा त्यामुळे नखं खराब होणार नाहीत. बाहेर पडताना संपूर्ण शरीर झाकले जाईल असे कपडे घाला. 

रंग खेळताना काही समस्या आल्यास गरम पाण्याने त्या भागावरील रंग काढऊ टाका. कोणत्याही कठीण वस्तूने त्वचेला घासू नका. रंग काढण्यासाठी बदाम तेल किंवा बेबी ऑईलचा वापर करा. एकाच धुण्याने रंग जात नसेल तर त्याला सतत घासू नका. रंग काढण्यासाठी डोळ्यांवर स्वच्छ पाण्याने फवारे मारा.

रंग काढून झाल्यानंतर त्वचेवर कोल्ड क्रीम किंवा मॉश्चरायझर लावा. सोयाबीनचे पीठ, बेसन, दूध यांसारख्या घरगुती वस्तूंचाही वापर करू शकता. त्वचेवर रंगामुळे अॅलर्जी किंवा लाल चट्टे असल्यास सूर्यच्या किरणांपासून दूर राहा. अधिक प्रमाणात समस्या वाटत असल्यास तात्काळ डॉक्टरांशी संपर्क साधा.