Hair Botox ट्रिटमेंट म्हणजे काय? अभिनेत्रींसारखे सुंदर केस मिळवणं होईल सोप, जाणून घ्या

केसांची वाढती समस्या टाळण्यासाठी सध्या हेअर बोटॉक्सची मागणी वाढू लागली आहे.  या उपचारात कोणत्याही प्रकारच्या इंजेक्शनचा वापर होत नसल्यामुळे, तुम्ही घरीही करू शकता. 

Updated: Jul 27, 2022, 09:19 PM IST
Hair Botox ट्रिटमेंट म्हणजे काय? अभिनेत्रींसारखे सुंदर केस मिळवणं होईल सोप, जाणून घ्या title=

HAIR CARE TREATMENTS:    बोटॉक्स हा शब्द ऐकल्यावर आपल्या मनात येणारा पहिला विचार ही इंजेक्शन्स वापरणारी उपचार आहे. ही एक अद्भुत सौंदर्य प्रक्रिया आहे. बोटॉक्स उपचारांचा वापर सामान्यत: फाईन लाईन्स, सुरकुत्या आणि त्वचा निस्तेज होऊ नये म्हणून केली जाते. एवढंच नाही तर एखाद्याला ओठ आणि गालांचा आकार बदलायचा असेल  तर त्यासाठीही बोटॉक्स खूप प्रभावी आहे.

पण तुम्ही कधी हेअर बोटॉक्सबद्दल ऐकले आहे का? हेअर बोटॉक्स तुम्हाला वाटते तसे अजिबात नाही.

हे नेहमीच्या बोटॉक्स उपचारांपेक्षा बरेच वेगळे आहे. केसांच्या आरोग्याला चालना देण्यासाठी हा एक डीप कंडिशनिंग उपचार आहे. सध्या सोशल मीडियावर वाढत्या लोकप्रियतेमुळे हेअर बोटॉक्स सौंदर्य उद्योगात चर्चेचा विषय बनला आहे. तज्ञांच्या मते, हेअर बोटॉक्स हे  अ‍ॅंटी एजींग उपचार आहे, जे खराब झालेल्या केसांवर उपचार करते.या प्रक्रियेदरम्यान केसांच्या गरजेनुसार कॅविअर ऑइल, व्हिटॅमिन बी-5, व्हिटॅमिन ई आणि बीओएनटी-एल पेप्टाइड ही रसायने मिसळून केसांवर लावली जातात. बोटॉक्स उपचारांमध्ये वापरण्यात येणारी उत्पादने केसांच्या इतर उपचारांपेक्षा सुरक्षित मानली जातात. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे बोटॉक्सने उपचार केलेले केस सुमारे 4 ते ५ महिने छान टिकतात
आणि ते त्यांचा सॉफ्टनेस आणि चमक टिकवून ठेवतात. चला तर मग जाणून घेऊया हेअर बोटॉक्स म्हणजे काय आणि त्याचे फायदे काय आहेत.

हेअर बोटॉक्स उपचार कोणी घ्यावे?

तुम्हाला स्प्लिट एन्ड्सची समस्या असल्यास, हेअर बोटॉक्स तुमच्यासाठी सर्वोत्तम आहे.
ज्या लोकांचे केस पातळ आणि कोरडे आहेत, त्या केसांना नैसर्गिक चमक मिळते.

प्रदूषणामुळे केस दूषित आणि अस्वस्थ होत आहेत. यामुळे लोक टक्कल पडण्याच्या तक्रारीही करत आहेत. अशा परिस्थितीत  हेअर बोटॉक्स हा या समस्येवर चांगला उपाय आहे.

हेअर बोटॉक्स म्हणजे काय

केराटिन आणि केसांच्या इतर उपचारांप्रमाणे, हेअर बोटॉक्स तुमच्या खराब झालेल्या केसांसह कुरळेपणा आणि निस्तेजपणा नियंत्रित करण्यास मदत करते.

या प्रक्रियेदरम्यान, केस अगदी सरळ होतात. हे केस डीप कंडिशनिंगसह दुरुस्त करण्यात नक्कीच मदत करते.

केसांच्या बोटॉक्सचे फायदे-

स्प्लिट एन्ड् सरळ करण्यासाठी चांगले
हेअर बोटॉक्सचा उद्देश केसांना डीप कंडिशनिंग करणे आहे. या प्रक्रियेनंतर, केसांचा कुरळेपणा जवळजवळ कमी होतो आणि तुमचे केस सरळ दिसू लागतात.
या केसांच्या उपचारांच्या मदतीने, स्प्लिट एंड्सची वाढ कमी होण्यास खूप मदत होते.

केसांचे नुकसान टाळा

या प्रक्रियेचा प्रयत्न केल्यावर तुमच्या केसांना होणारे रासायनिक नुकसान देखील दुरुस्त केले जाऊ शकते.
केसांना चमक आणा
केसांना चमकदार आणि निरोगी दिसण्यासाठी हेअर बोटॉक्स हा एक चांगला मार्ग आहे

.
केसांचे बोटॉक्स कसे करावे

स्टेप-1-  सर्वप्रथम तुम्हाला तुमचे केस चांगले धुवावे लागतील.
स्टेप-2- आता केस वेगवेगळ्या भागात कोरडे करा. बोटॉक्स उपचार तुमच्या केसांना मुळांपासून टाळूपर्यंत पूर्णपणे लागू केले जातील. उपचार सुमारे 45 मिनिटे सोडले जातील. नंतर बोटॉक्स धुण्यासाठी सल्फेट-मुक्त क्लीन्सर वापरा.

स्टेप-3- यानंतर केस वाळवले जातील , काही सलूनमध्ये  केस न धुता कोरडे करतात आणि सरळ करतात.

बोटॉक्स उपचारानंतर केसांची काळजी

आपल्या केसांसाठी सल्फेट आणि सिलिकॉन नसलेला शैम्पू वापरा. केसांचा ड्रायनेस दूर ठेवण्यासाठी नेहमी कंडिशनींग  करा.
केसांच्या डीप कंडिशनिंगसाठीआठवड्यातून एकदा केसांचा मास्क करा.

कोणत्याही केसांना स्टाइल करण्यासाठी हीट स्टाइलिंग टाळा.  आवश्यक असल्यास, हीट स्टाइलिंग साधनं वापरण्यापूर्वी  केसांवर हीट स्प्रे वापरा

उन्हाळ्यात घराबाहेर पडण्यापूर्वी केसांना सिल्क स्कार्फने झाकून ठेवा.

हेअर बोटॉक्स  थोडे महाग असू शकतात.  सलूनमधील उपचारानुसार हेअर बोटॉक्सची किंमत रु. 11000 ते रु. 23000 पर्यंत असू शकते. आपल्याला दोन ते तीन सेशन्सची आवश्यकता आहे.  बोटॉक्स उपचारांचा केसांच्या संरचनेवर परिणाम होत नसल्यामुळे, सरळ कुरळे केस तितके सरळ दिसणार नाहीत.

केसांची वाढती समस्या टाळण्यासाठी सध्या हेअर बोटॉक्सची मागणी वाढू लागली आहे.  या उपचारात कोणत्याही प्रकारच्या इंजेक्शनचा वापर होत नसल्यामुळे, तुम्ही घरीही करू शकता.  लक्षात ठेवा की कोणतेही केमिकल प्रोडक्ट वापरण्यापूर्वी केस तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.