मुंबई : मे महिना सुरू आहे तापमान दिवसेंदिवस आपली उंची गाठत आहे. अशात कायम प्रश्न पडतो की, कोणते कपडे घालावेत. नेमकं काय टाळावे आणि काय घालावे हेच कळत नाही. कपडे निवडताना काही गोष्टींचा विचार अगदी सावधपणे करायला हवा जेणे करून उन्हाच्या झळा लागणार नाहीत. आणि हे सगळं करताना आपण स्टायलिश कसे राहू हे सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे.
काही महत्वाच्या टिप्स आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. ज्या टीप्स फॉलो करून तुम्ही उन्हाळ्यातही स्टायलिश राहून एन्जॉय करू शकता.
1) सैल कपडे वापरा : उन्हाळा असल्यामुळे तुम्ही कपडे निवडताना अतिशय सैल कपडे निवडा. जेवढं कमी फॅब्रिक तुमच्या अंगाला लागेल तेवढं कमी गरम होईल. कमी गरम होण्यासाठी सुती कपड्यांचा वापर करा. अतिशय घट्ट, अंगाला चिटकणारे कपडे वापरू नका.
2) फॅब्रिक्स निवडताना कोणती काळजी घ्याल : कॉटन आणि लिननचे कपडे गर्मीत आराम देतात. उन्हाळ्यात कपडे निवडताना काळजी घ्या. ज्या कपड्यांमध्ये घाम शोसून घेतला जाईल असे कपडे वापरा. सिल्क, सिन्थॅटिक आणि नायलॉन सारखे कपडे अजिबात वापरू नका. गर्मीच्या या दिवसांत या मटेरिलयचे कपडे घालणे शरीराला नुकसान देणार आहे.
3) हलक्या रंगाचे कपडे वापरा : उन्हाळ्यात कपडे निवडताना रंगाची देखील काळजी घ्या. गर्मीत हलक्या रंगाचे कपडे घाला. जास्त करून सफेद रंगाचे कपडे घाला. या दिवसांत काळ्या रंगाचा वापर अजिबात करू नका.
4) भडक रंगाचे कपडे घालू नका : या दिवसांत भडक रंगाचे कपडे अजिबात घालू नका. खास करून काळा रंग टाळा. लाईट एब्सोर्ब करणारे रंगाचे कपडे या दिवसांत नका घालू.
5) कमीत कमी दागिन्यांचा वापर करा : उन्हाळ्यात ईअर रिंग्स व्यतिरिक्त दुसरी कोणतीच गोष्ट वापरू ना. कानातले हे आपल्या शरिरातील फार कमी ठिकाण व्यापतात. ज्यामुळे तुम्हाला कमी गरम होतं. पण नेकलेस, चैन, बांगड्या यासारखी ज्वेलरी घालू नका. मेटलच्या गोष्टींचा कमी वापर करा.