भूक लागल्यावर चिडचिड का होते?

भूक लागल्यावर अनेकदा चिडचिड होते, राग येतो.

Darshana Pawar Darshana Pawar | Updated: Dec 30, 2017, 01:30 PM IST
भूक लागल्यावर चिडचिड का होते? title=

मुंबई : भूक लागल्यावर अनेकदा चिडचिड होते, राग येतो. आपल्यापैकी अनेकांनी हा अनुभव घेतला असेल. तो राग आपण मग सोबतच्या जवळच्या व्यक्तीवर काढतो. 
अनेकदा अशा लहान-सहान गोष्टींवरून वाद होतात. Ohio State University च्या शास्त्रज्ञानांनुसार भूक लागण्याचा आणि राग येण्याचा संबंध आहे. स्वतःवर नियंत्रण ठेऊ न शकल्यामुळे भांडणे होतात ?

स्वतःवर नियंत्रत न ठेवता येण्यामागचे कारण

तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार बडबड करणाऱ्या लोकांचे स्वतःवर नियंत्रण नसते. सुरवातीच्या टप्प्यात त्यांची बडबड, त्याचा टोन आणि मग स्वभाव यामुळे ते लोक आणि समोरच्या व्यक्तीची देखील चिडचिड होते. त्यामुळे भांडणांची सुरुवात होते. पण स्वतःवर नियंत्रत न ठेवता येण्यामागचे कारण तुम्हाला माहित आहे का ? तर शरीरातील ग्लुकोज कमी होणे. 

शरीरातील ग्लुकोजची पातळी कमी झाल्याने स्वतःवर नियंत्रण राहत नाही, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. स्वतःवर नियंत्रण ठेवण्यासाठी ऊर्जेची गरज असते ती ग्लुकोजमधून भागवली जाते. 

प्रयोगातून सिद्ध

शास्त्रज्ञानांनी १०७ विवाहित जोडप्यांवर २१ दिवस एक प्रयोग केला. त्यात असे दिसून आले की, रागाचे प्रमाण हे रक्तातील साखरेच्या प्रमाणावर अवलंबून असते. आपल्या पार्टनरचे प्रतिक म्हणून त्यांना voodoo dolls देण्यात आल्या. राग आल्यानंतर त्या डॉल्सना ०-५१ पिन्स डोचण्यास सांगितले. त्यात असे दिसून आले की, भूक लागल्यावर ते डॉल्सना अधिक पिन्स टोचत होते. रागाचे प्रमाण मोजण्यासाठी त्या जोडप्यांना २५ टास्क एकत्र करण्यास दिले. प्रत्येक टास्कचा विनरने हेडफोन्स मधून जोरात ओरडायचे, असे सांगण्यात आले.  जसं शास्त्रज्ञाना दिसून आलं की, रक्तातील ग्लुकोजची पातळी कमी झाल्याने लोकांनी डॉल्सवर जास्त पिन्स टोचल्या. 

रक्तातील ग्लुकोज कमी होऊ नये म्हणून काय करावे ?

या सगळ्यावरून असे दिसून येते की, रक्तातील ग्लुकोज कमी होऊ नये म्हणून कॅण्डीज, बिस्किट्स, स्वीट्स सोबत ठेवा. विशेषतः जर तुम्हाला असा त्रास नेहमी होत असेल तर बाहेर जाताना सोबत चॉकलेट सारखे गोड पदार्थ ठेवा किंवा घरी असताना देखील असा काही त्रास जाणवल्यास काहीतरी गोड खा.