मुंबई : आळशीपणामध्ये कोण पुढे? पुरुष की महिला? याचं प्रत्येकजण काहीतरी वेगवेगळं उत्तर देईल. पण आता याबाबत एक खुलासा करण्यात आला आहे. एका संशोधनातून सर्वात आळशी कोण? याबाबतची माहिती समोर आली आहे. भारतात 35 टक्क्यांहून अधिक लोक शारीरिक श्रम करण्यासाठी आळस करत असल्याचं संशोधनातून समोर आलं आहे.
संशोधनानंतर, जागतिक आरोग्य संस्थेने (WHO) याबाबतची आकडेवारी दिली आहे. WHOने या संशोधनाच्या आधारे, शारीरिक कार्यात सक्रियता न दाखवणाऱ्या लोकांना हृदयासंबंधी रोग, कॅन्सर, मधुमेह आणि मानसिक आजारांचा धोका संभवण्याची शक्यता असल्याचं म्हटलं आहे.
संशोधनातून, 2016 मध्ये शारीरिक श्रम कमी करणाऱ्या महिलांची संख्या 50 टक्के होती. तर शारीरिक श्रम करणाऱ्या पुरुषांची संख्या 25 टक्के इतकी होती.
जगभरात तीनपैकी एक महिला पुरेशी शारीरिक हालचाल करत नाही. तर पुरुषांमध्ये हा आकडा चारपैकी एक असा आहे.
मात्र, हा आकडा अधिक उत्पन्न असणाऱ्या आणि कमी उत्पन्न असणाऱ्या देशांमधील वेगवेगळा होता. अधिक उत्पन्न असणाऱ्या देशांमध्ये शारीरिक श्रम करणाऱ्यांचा आकडा 37 टक्के इतका आहे. मध्यम उत्पन्न असणाऱ्या देशांमध्ये हे प्रमाण 26 टक्के तर कमी उत्पन्न असणाऱ्या देशात हा आकडा 16 टक्के इतका आहे.