World Breastfeeding Week: स्तनदा मातेचं दुध वाढवण्यासाठी कोणता आहार चांगला? तज्ज्ञांचा सल्ला

World Breastfeeding Week: खाण्यापिण्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे अनेक महिलांच्या स्तनातील दुधाचे उत्पादन कमी होते. पण तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही, कारण नव मातांसाठी या 5 पदार्थांचा आपल्या आहारात समावेश केल्यास दुधाचा पुरवठा वाढवण्यात मदत होऊ शकते.

सुरभि जगदीश | Updated: Jul 31, 2024, 09:30 PM IST
World Breastfeeding Week: स्तनदा मातेचं दुध वाढवण्यासाठी कोणता आहार चांगला? तज्ज्ञांचा सल्ला title=

World Breastfeeding Week: 1 ऑगस्ट 7 ऑगस्ट जागतिक स्तनपान सप्ताह पाळला जातो. आई आणि बाळ या दोघांच्या आरोग्यासाठी स्तनपान गरजेचे आहे. बाळाच्या पोषणाच्या बाबत आईच्या दुधाची कमतरता भासू नये हे खूप महत्त्वाचं असतं. आईला जर दूध कमी येत असेल तर ते वाढवण्यासाठी पोषक आहार घेणे गरजेचे आहे. ज्याचा फायदा बाळाच्या पोषणासोबतच आईलासुध्दा होतो.तुमच्या आहारात पोषक घटकांचा समावेश केल्याने दुधाचा पुरवठा वाढू शकतो. 

मुंबईतील आहारतज्ज्ञ डॉ. जिनल पटेल यांनी दिलेल्या माहितीनुसार, बाळाला आईचे भरपूर दूध मिळावे यासाठी स्तनदा मातांनी काही पदार्थ आवर्जून खाल्लेच पाहिजेत.  नवजात बालकांना दर एक किंवा दोन तासांनी स्तनपान देणे आवश्यक असे जे ज्यामुळे नव मातांना थकवा येऊ शकतो. आई जेव्हा मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या सशक्त असेल, तेव्हाच ती बाळाला पुरेसे दूध देऊ शकेल आणि तिच्या बाळाची भूक भागवू शकेल. बाळाच्या वाढीसाठी आणि विकासासाठी आईचे दूध आवश्यक आहे. त्यात आवश्यक पोषकतत्वे आहेत जे विविध समस्यांचा सामना करण्यासाठी मदत करतात.  बाळाची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यास फायदेशीर ठरतात. पुरेसे दूध न येणे ही एक गंभीर समस्या आहे ज्यावर वेळीच लक्ष देणे गरजेचे आहे. 

खाण्यापिण्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे अनेक महिलांच्या स्तनातील दुधाचे उत्पादन कमी होते. पण तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही, कारण नव मातांसाठी या 5 पदार्थांचा आपल्या आहारात समावेश केल्यास दुधाचा पुरवठा वाढवण्यात मदत होऊ शकते.

मेथीचे दाणे

हे एक लैक्टोजेनिक अन्न मानले जाते जे संभाव्यतः मातांना त्यांच्या दुधाचा पुरवठा वाढविण्यास मदत करते.  मेथीचे दाणे हे दूध वाढवण्यासाठी आवश्यक हार्मोन्स उत्तेजित करतात ज्याची मातेला आवश्यकता असते. हे प्रोलॅक्टिन नावाच्या संप्रेरकाच्या उत्पादनास मदत करते, जे दूध वाढविण्यास उपयुक्त ठरते.

चणे

स्तनपान करणार्‍या मातांसाठी आवश्यक पोषक तत्वं प्रदान करतात. विशेषत: जेव्हा तुम्ही स्तनपान करत असाल तेव्हा तुम्हाला प्रोटीनची आवश्यकता असते ती या माध्यमातून भरुन काढता येते. ते स्तनाच्या ऊतींची दुरुस्त करण्यास आणि दुधाचा पुरवठा वाढविण्यास मदत करतात.

लसूण

हे जवळजवळ प्रत्येक भारतीय पदार्थात मोठ्या प्रमाणावर वापरले जाते. स्तनपान करणाऱ्या मातांना त्यांच्या दुधाचा वाढविण्यासाठी लसूण खाण्याचा सल्ला दिला जातो. एकतर तो कच्चा खाऊ शकतो किंवा सूप, दलिया, डाळ आणि खिचडी यांसारख्या असंख्य पदार्थांमध्ये घालून त्याचे सेवन करता येऊ शकते. मात्र जास्त प्रमाणात लसणाचे सेवन करु नका कारण बाळाला आईच्या दुधात लसणाचा तीव्र वास आवडत नाही.

आले

त्यात काही फायदेशीर गुणधर्म आहेत जे स्तनपान करणाऱ्या मातांना त्यांच्या दुध वाढविण्यास मदत करतात. तुम्ही तुमच्या नेहमीच्या जेवणात आल्याचा वापर करु शकता. भाज्या, करी, स्ट्यू, सूप, डाळ, पराठा आणि चहा यांसारखे विविध पदार्थ बनवू शकता.

तीळ

हे ओमेगा -3 फॅटी ऍसिडस्, जीवनसत्त्वे, खनिजे आणि कॅल्शियम सारख्या आवश्यक पोषक तत्वांनी भरलेले आहे. आईच्या दुधासाठी आणि बाळाच्या निरोगी वाढीस प्रोत्साहन देण्यासाठी तीळाचे सेवन उपयुक्त ठरते. हे आई आणि बाळ दोघांसाठीही तितकेच फायदेशीर आहेत. प्रसूतीनंतर लवकर बरे होण्यासाठी आणि दुधाचा वाढवण्यासाठी गुळाने बनवलेले तिळाचे लाडू नव मातांना खाऊ घालण्याची परंपरा आहे.