World Health Day 2024 : छोट्या छोट्या गोष्टींवर जीव घाबरा-घुबरा होतो, 'या' 4 टिप्सने स्वतःला करा शांत

World Health Day : आजकाल लोकांची जीवनशैली झपाट्याने बदलत आहे. अशा परिस्थितीत अनेकांना शारीरिक आरोग्यासोबत मानसिक आरोग्याच्या समस्या बळावत आहेत. एवढेच नाही तर आजकाल कामाच्या वाढत्या दबावामुळे लोक त्यांच्या आरोग्याकडेही दुर्लक्ष करू लागले आहेत. अशा परिस्थितीत, आरोग्य आणि संबंधित समस्यांबद्दल जागरूकता पसरविण्याच्या उद्देशाने दरवर्षी 7 एप्रिल रोजी 'जागतिक आरोग्य दिन' साजरा केला जातो.

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: Apr 7, 2024, 07:52 AM IST
World Health Day 2024 : छोट्या छोट्या गोष्टींवर जीव घाबरा-घुबरा होतो, 'या' 4 टिप्सने स्वतःला करा शांत title=

झपाट्याने बदलणाऱ्या जीवनशैलीचा परिणाम आपल्या आरोग्यावरही दिसून येत आहे. आपल्या खाण्यापासून आपल्या जीवनशैलीपर्यंत प्रत्येक गोष्टीचा आपल्या आरोग्यावर थेट परिणाम होतो. चांगलं आयुष्य जगण्यासाठी निरोगी असणं खूप गरजेचं आहे. मात्र, आजकाल लोकांची जीवनशैली झपाट्याने बदलू लागली आहे, त्यामुळे लोक अनेक आरोग्य समस्यांना बळी पडत आहेत. अशा परिस्थितीत लोकांमध्ये आरोग्याबाबत जनजागृती करण्यासाठी दरवर्षी 7 एप्रिल रोजी 'जागतिक आरोग्य दिन' साजरा केला जातो.

हा दिवस जागतिक आरोग्य संघटना (WHO) द्वारे दरवर्षी एखाद्या विशिष्ट आरोग्य समस्येबद्दल जागरूकता पसरवण्यासाठी आणि जगभरातील लोकांवर परिणाम करणाऱ्या आरोग्य समस्यांचे निराकरण करण्यासाठी साजरा केला जातो. आजकाल शारीरिक आरोग्यासोबतच मानसिक आरोग्यही चिंतेचा विषय बनला आहे. लोक मानसिक आरोग्याशी संबंधित अनेक समस्यांना बळी पडत आहेत. चिंता ही यापैकी एक समस्या आहे ज्यामुळे लोक अनेकदा त्रस्त राहतात. अशा परिस्थितीत आज आरोग्य दिनानिमित्त आम्ही तुम्हाला चिंता दूर करण्यासाठी काही प्रभावी टिप्स सांगणार आहोत.

ट्रिगर ओळखा

चिंता टाळण्यासाठी, समस्येला कारणीभूत ठरणारे ट्रिगर ओळखा आणि जेव्हा शक्य असेल तेव्हा त्यांचा संपर्क कमी करण्याचा प्रयत्न करा. यासाठी तुम्हाला काही लोक किंवा परिस्थितींसह सीमा सेट करण्याची आवश्यकता असू शकते. आपला ट्रिगर पॉईंट आपण स्वतः ओळखलात तर अधिक चांगला फायदा होईल. 

वर्तमानात रहा

भविष्याची चिंता करण्याऐवजी किंवा भूतकाळाचा विचार करण्याऐवजी वर्तमानावर लक्ष केंद्रित करा. यासाठी तुम्ही डीप ब्रीदिंग किंवा ग्राउंडिंग तंत्र यांसारख्या माइंडफुलनेस तंत्रांची मदत घेऊ शकता. हे आपले लक्ष वर्तमानाकडे परत आणण्यास आणि चिंता कमी करण्यात मदत करू शकते.

विश्रांती आणि शारीरिक ऍक्टिविटी

तुमच्या दैनंदिन दिनचर्येत विश्रांती आणि शारीरिक हालचाल असणे गरजेचे आहे. अशावेळी योग, ध्यान, निसर्गात वेळ घालवणे इत्यादींचा समावेश करा. शरीर सक्रिय ठेवण्यासाठी शारीरिक हालचाली आवश्यक आहेत. हे तुमचे मन आणि शरीर शांत करण्यात मदत करू शकते. अनेकदा आपल्या शरीरासोबत मनाला देखील विश्रांतीची गरज असते. अशावेळी काही गोष्टी ठरवून करा. 

नकारात्मक विचारांना आव्हान द्या

चिंता नियंत्रित करण्यासाठी, नकारात्मक विचारांपासून दूर राहणे आवश्यक आहे. अशा परिस्थितीत नकारात्मक विचारांना आव्हान द्या आणि तुमचे लक्ष सकारात्मक विचारांकडे अधिक केंद्रित करा. स्वतःला चांगल्या कामात गुंतवून ठेवा. ज्यामुळे तुमचं मन तेव्हाच्या वर्तमानातील कृतीत राहिल.