World Mosquito Day : एक छोटासा मच्छर तुमचा जीव घेऊ शकतो

 २० ऑगस्ट १८९७ मध्ये ब्रिटीश डॉ. रोनाल्ड रॉसने या गोष्टीचा शोध लावला की, मच्छर चावल्याने मलेरिया होतो. तेव्हा पासून आजच्या दिवसाला विश्व मॉस्किटो डे (World Mosquito Day) म्हटलं जातं.

Updated: Aug 20, 2019, 04:45 PM IST
World Mosquito Day : एक छोटासा मच्छर तुमचा जीव घेऊ शकतो

मुंबई :  पावसाळ्यात जागो-जागी पाणी जमा झाल्याने सगळीकडे मच्छरांची वाढ होऊ लागते आणि त्यामुळे डेंग्यू, मलेरिया आणि चिकनगुनिया मोठ्या प्रमाणात लोकांना होतो. यापासून सुटका मिळवण्यासाठी खूप उपक्रम केले जातात, तरी देखील दर वर्षी हजारो लोक, मलेरिया आणि डेंग्यूचे शिकार होतात. २० ऑगस्ट १८९७ मध्ये ब्रिटीश डॉ. रोनाल्ड रॉसने या गोष्टीचा शोध लावला की, मच्छर चावल्याने मलेरिया होतो. तेव्हा पासून आजच्या दिवसाला विश्व मॉस्किटो डे (World Mosquito Day) म्हटलं जातं.

असे म्हटले जाते की, कोणती आपदा किंवा कोणत्या विकारामुळे एवढा त्रास माणसाला होत नाही, जेवढा एका लहान मच्छरापासून होतो. एक मच्छर एक व्यक्तीच एकदा ०.१ मिलीमीटर रक्त पितो, ज्यामुळे मलेरिया, डेंग्यू आणि चिकनगुनिया सारखे विकार होऊ शकतात. या विकारांमुळे व्यक्तीचे प्राण देखील जाऊ शकतात.

माहितीनुसार मच्छर चावल्याने होणाऱ्या विकारांपासून दरवर्षी लाखो लोकांचा मृत्यु होतो. ज्यात सगळ्यात जास्त मृत्यू आफ्रिकी देशांमध्ये होतात. मच्छर चावल्याने होणारे आजार जगातील प्राणघातक आजारांमधले एक आहेत. ज्यात डेंग्यू,  पिवळा ताप, एन्सेफलेटीस एखाद्या व्यक्तीच्या मृत्युचे कारण देखील ठरू शकतो.

मच्छरांपासून स्वत: चे रक्षण करण्यासाठी उपाय
मच्छरांपासून होणाऱ्या विकारांपासून स्वत: चे आणि कुटूंबाचे रक्षण करायचे असेल तर, फक्त आपल्या आजूबाजूला नव्हे तर, आपल्या परिसराला देखील साफ ठेवा. 

घरात किंवा घराच्या बाहेर पाणी साठू देऊ नका आणि आजुबाजूच्या परिसरात जर उघडे नाले असतील, तर त्यांना लगेच बंद करा. विटामिनने भरपूर असलेले फळांचे सेवन करा. त्यासोबत घरात असलेल्या पाण्याच्या टाक्या, कूलर आणि ट्यूब-टायरमध्ये पाणी भरू देऊ नका. अशक्त वाटल्यास त्वरीत डॉक्टरांकडे जा, आणि ब्लड टेस्ट करणे विसरू नका.