Yoga for Fitness: घरी फक्त 10 मिनिटं करा ही 2 योगासनं आणि नेहमी रहा फीट

शरीराला तंदुरुस्त ठेवण्यासाठी आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी कोणती दोन योगासने करावीत ते जाणून घेऊया.

Updated: Oct 28, 2021, 06:53 PM IST
Yoga for Fitness: घरी फक्त 10 मिनिटं करा ही 2 योगासनं आणि नेहमी रहा फीट title=

मुंबई : शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी लोक जिममध्ये तासनतास व्यायाम करत असतात. त्यामुळे शरीर जड होते, पण तंदुरुस्त होत नाही. शरीर तंदुरुस्त होण्यासाठी लवचिकता आणि सडपातळ पोट खूप महत्त्वाचे आहे. ज्यासाठी तुम्ही ही 2 योगासने रोज 10 मिनिटे करावीत. या योगासनांमुळे इम्युनिटी बूस्ट देखील होते. ज्यामुळे शरीर संक्रमण आणि आजारांपासून दूर राहते.

शरीराला तंदुरुस्त ठेवण्यासाठी आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी कोणती दोन योगासने करावीत ते जाणून घेऊया.

बेली फॅट कमी करण्यासाठी मंडूकासन (Frog Pose to reduce belly fat)

पोटावरची चर्बी कमी करण्यासाठी मंडूकासन केलं पाहिजे. यामुळे पाचन क्रिया सुधरते आणि शरीराला चांगलं पोषण मिळतं.

1. सर्वप्रथम वज्रासनाच्या आसनात बसावे.
2. आता मुठ बंद करा आणि अंगठे बाहेर ठेवा.
3. यानंतर पोट आतून खेचा आणि मुठ नाभीवर ठेवा.
4. आता श्वास सोडताना डोके गुडघ्याकडे आणा आणि श्वास रोखून धरा.
5. शेवटी, हळूहळू श्वास घेत वरच्या दिशेने या.

लवचिकतेसाठी भुजंगासन (Bhujangasan)

शरीराचा वरचा भाग लवचिक बनवण्यासाठी आणि फुफ्फुस उघडण्यासाठी भुजंगासन खूप फायदेशीर आहे. हे करण्यासाठी खालील चरणे करा.

1. सर्व प्रथम, चटईवर पोटावर झोपा.
2. आता हात खांद्याखाली जमिनीवर ठेवा.
3. यानंतर छातीला कंबरेपासून वर उचला आणि शक्य तितके मागे डोके न्या.
4. या अवस्थेत श्वास घ्या आणि छाती, खांदे, कंबर इत्यादींमध्ये ताण जाणवेल.
5. शेवटी, श्वास सोडा आणि सामान्य स्थितीत परत या.

येथे प्रदान केलेली माहिती कोणत्याही वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय नाही. ते केवळ शिक्षणाच्या उद्देशाने दिले जात आहे.