मुंबई : थंडीत ओठ फुटतात, कोरडे पडतात. त्यावर आपण आवर्जून लिपबाम लावतो. मात्र याशिवाय लिपबामचे इतर काही फायदे असतील, हे आपल्याला माहित देखील नाही. पण ओठांना सॉफ्ट करण्याव्यतिरिक्त लिपबामचे इतर अनेक फायदे आहेत. जाणून घेऊया....
फ्रिजी हेअरर्स असल्यास अनेक मुली सीरम, हेअर स्प्रे आणि हेअर ऑईलचा वापर करतात. मात्र तुम्हाला माहित आहे का फ्रिजी हेअरर्स चांगले करण्यासाठी लिपबामचा वापर करू शकता.
लिपबाम असल्यास तुम्हाला आयब्रो जेलची गरज नाही. तुम्ही लिपबाम आयब्रोला लावून त्याला शेप देऊ शकता. त्यामुळे आयब्रोचे केस नीट सेट होतील.
तुम्ही लिपबाम गालाला देखील लावू शकता आणि त्यावर फाऊंडेशन लावल्याने चेहऱ्यावर ग्लो येतो.
परफ्यूमचा सुगंध खूप काळ राहतो. मात्र हा सुगंध अजून काही काळ टिकून राहावा, असे जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही परफ्यूम स्प्रे करण्यापूर्वी लिपबाम लावा.
शरीराचे हे भाग अधिक कोरडे असतात. त्यांना पोषणाची गरज असते. त्यामुळे या भागांवर लिपबाम लावल्यास त्या ठिकाणची त्वचा अधिक सॉफ्ट होते.