नवी दिल्ली : भारतासह जगात 15 देशात संरक्षणमंत्रीपदी महिला आहेत. निर्मला सीतारमन यांच्याकडे संरक्षणमंत्रिपदाची धुरा सोपवण्यात आली आहे. इंदिरा गांधीनंतर देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच संरक्षण मंत्रीपदी महिलेची वर्णी लागली आहे.
मात्र जगभरातही विविध देशांच्या संरक्षण मंत्रालयाची जबाबदार महिला मंत्र्यांवर आहे.
श्रीलंकेतून याची सुरुवात झाली होती. श्रीलंकेने पहिल्यांदाच 1960 साली श्रीमावो भंडारनायको यांच्याकडे संरक्षण मंत्रालयाची धुरा दिली होती. त्यानंतर 1980 साली इंदिरा गांधी यांनी पंतप्रधान असताना संरक्षण मंत्रीपदाची जबाबदारी सांभाळली.
बांगलादेश – शेख हसीना (पंतप्रधान आणि संरक्षण मंत्री)*फ्रान्स – फ्लोरेंस पार्लीस्पेन – मारिया डोलोरेस दि कोस्पेदाल*ऑस्ट्रेलिया – मरीस ए पेनइटली – रॉबर्टा पिनोट्टी*दक्षिण आफ्रिका – नॉसिव्हीव मॅपिसा*रिपब्लिकन ऑफ मॅसिडोनिया – रादमिला सेकेरिंस्का*स्लोव्हेनिया – एंद्रेजा कटिक
तसेच नेदरलँड, निकारागुआ, केनिया, अल्बानिया, नॉर्वे आणि बॉस्निया अँड हर्जेगोव्हिना या देशांच्या संरक्षण मंत्रीपदीही महिला मंत्री आहे.