इराकमध्ये २०००हून अधिक आयसिस दहशतवाद्यांचा खात्मा

जगभरात दहशतवादाचे थैमान घातलेल्या संघटनांपैकी एक इस्लामिक स्टेट (आयएस) या दहशदवादी संघटनेच्या २०००हून अधिक दहशतवाद्यांना कंटस्नान घालण्यात आले आहे. इराकमधील मोसुल या पश्चिम विभागातील भाग आयएसच्या प्रभावातून मुक्त करण्यासाठी राबविण्यात आलेल्या मोहिमेत ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत ५० हून अधिक आत्मघातही दहशतवाद्यांचाही खात्मा करण्यात आला. इराक सरकारने लष्कराच्या मदतीने ही कारवाई केली.

Annaso Chavare अण्णासाहेब चवरे | Updated: Sep 3, 2017, 06:47 PM IST
इराकमध्ये २०००हून अधिक आयसिस दहशतवाद्यांचा खात्मा title=

बगदाद : जगभरात दहशतवादाचे थैमान घातलेल्या संघटनांपैकी एक इस्लामिक स्टेट (आयएस) या दहशदवादी संघटनेच्या २०००हून अधिक दहशतवाद्यांना कंटस्नान घालण्यात आले आहे. इराकमधील मोसुल या पश्चिम विभागातील भाग आयएसच्या प्रभावातून मुक्त करण्यासाठी राबविण्यात आलेल्या मोहिमेत ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत ५० हून अधिक आत्मघातही दहशतवाद्यांचाही खात्मा करण्यात आला. इराक सरकारने लष्कराच्या मदतीने ही कारवाई केली.

वृत्तसंस्था सिन्हुआने दिलेल्या वृत्तानुसार, ज्वाईंट ऑपरेशन कमांडचे (जेओसी) लेफ्टनंट जनरल अब्दुल आमिर याराल्लाह यांनी पत्रकार परिषदेत माहिती देताना सांगितले की, ''२० ते ३१ ऑगस्ट या काळात केलेल्या बॉम्बवर्षावात ५० हून अधिक आत्मघातकी दहशतवादी तसेच, २००० हून अधिक दहशतवादी मारले गेले. याशिवाय सुमारे ७७ कार बॉम्ब, बॉम्ब लावण्यात आलेल्या ७१ इमारती तसेच, रस्त्याकडेला पेरण्यात आलेले सुमारे ९९० बॉम्ब नष्ट करण्यात आले.

पुढे बोलताना रारल्लाह यांनी सांगितले की, या मोहिमेसाठी पोलीस आणि रिस्पॉन्स फोर्सचे कमांडो, काऊंटर-टेरेरिजम सर्व्हिस (सीटीएस) असे इराक लष्करातील ४०,००० हून अधिक सैनिक सहभागी झाले होते. या मोहिमेसाठी आंतरराष्ट्रीय आघाडीच्या लष्करी विमान सेवेचाही उपयोग करण्यात आला.