close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

व्हिडिओ : जेव्हा १५ फुटी अजगरानं गिळली संपूर्ण बकरी!

पाऊस पडल्यामुळे साप-अजगर रस्त्यावर दिसू लागलेत. अशामध्ये देशभरात अनेक ठिकाणांहून वेगवेगळी फोटो - व्हिडिओ समोर येऊ लागलेत.

Updated: Jun 17, 2017, 12:45 PM IST
व्हिडिओ : जेव्हा १५ फुटी अजगरानं गिळली संपूर्ण बकरी!

नवी दिल्ली : पाऊस पडल्यामुळे साप-अजगर रस्त्यावर दिसू लागलेत. अशामध्ये देशभरात अनेक ठिकाणांहून वेगवेगळी फोटो - व्हिडिओ समोर येऊ लागलेत.

आसाममधून असाच एक अजगराचा एक व्हिडिओ समोर आलाय. या व्हिडिओमध्ये या अजगराचं पोट फुगलेलं दिसतंय. कारण, या १५ फुटी अजगरानं एका बकरीला संपूर्ण गिळून टाकलंय. 

पोटात बकरी गेल्यानंतर मात्र अजगराला हालचाल करणंही कठिण होऊन बरलं. 

ही घटना आसामच्या बेहता चरियल गावातली आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेला दिसतोय. 

गावकऱ्यांनी आणि वनाधिकाऱ्यांनी नंतर या अजगराला जंगलात सोडून दिलं.