गेल्या 24 तासांत देशात 26,567 कोरोना रुग्णांची वाढ, 385 रुग्णांचा मृत्यू

देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत घट

Updated: Dec 8, 2020, 11:03 AM IST
गेल्या 24 तासांत देशात 26,567 कोरोना रुग्णांची वाढ, 385 रुग्णांचा मृत्यू title=

नवी दिल्ली : गेल्या 24 तासांत भारतात 26,567 नवीन कोरोना रुग्ण वाढले आहेत. तर 385 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. गेल्या 5 महिन्यांत एकाच दिवसात संक्रमित झालेल्या लोकांची ही सर्वात कमी संख्या आहे. भारतात कोरोना विषाणूच्या संसर्गाचे प्रमाण कमी होताना दिसत आहे. त्यामुळे सक्रिय प्रकरणांमध्ये सतत घट होत आहे. आतापर्यंत भारतातील 91,78,946 लोकांनी कोरोनावर मात केली आहे. गेल्या 24 तासांत 39,045 लोकं बरे झाले आहेत आणि त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. 

भारतात आता कोरोनाचे 3,83,866 सक्रिय रुग्ण आहेत. देशात कोरोनावरील लस शोधण्यासाठी देखील वेगाने काम सुरु आहे. अशा परिस्थितीत लवकरच कोरोनाविरुद्ध भारत युद्ध जिंकण्याच्या तयारीत आहे.

आतापर्यंत भारतात कोरोना विषाणूची 97,03,770 लोकांना लागण झाली आहे आणि 1,40,958 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. इतर अनेक देशांच्या तुलनेत भारतात मृत्यूचे प्रमाण खूपच कमी आहे. आरोग्य मंत्रालयाने बर्‍याच कठोर उपाययोजना केल्या आहेत आणि कोरोना तपासणीची व्याप्ती सतत वाढविली आहे.

महाराष्ट्र, केरळ, दिल्ली, राजस्थान आणि पश्चिम बंगालमध्ये कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत. पण या राज्यांतही कोरोना विषाणूचे प्रमाण काहीसे कमी झाले आहे. गेल्या 24 तासात देशभरात 10,26,399 कोरोना चाचणी घेण्यात आली. आतापर्यंत देशात 14,88,14,055 कोरोना टेस्ट घेण्यात आल्या आहेत.