देशात अवकाळी पावसाने ३९ जणांचा बळी, मोदींच्या रॅलीसाठी लावण्यात आलेले मंडप उध्वस्त

देशातील अनेक भागांना अवकाळी पावसाने झोडपले आहे. मंगळवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.

Updated: Apr 17, 2019, 12:12 PM IST
देशात अवकाळी पावसाने ३९ जणांचा बळी, मोदींच्या रॅलीसाठी लावण्यात आलेले मंडप उध्वस्त  title=

नवी दिल्ली : देशातील अनेक भागांना अवकाळी पावसाने झोडपले आहे. मंगळवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. राजस्थानमध्ये झालेल्या अवकाळी पावसाने 6 लोकांचा जीव घेतला आहे. तर मध्य प्रदेशमध्ये 16 लोकांचा मृत्यू झला आहे. सूत्रांनी दिलेल्या महितानुसार देशभरात झालेल्या अवकाळी पावसाने एकुण 39 जणांचा बळी घेतला आहे. त्याचप्रमाणे जखमींचा अकडा अद्याप समोर आलेला नाही. अवकाळी पावसामुळे तिन्ही राज्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. मध्यप्रदेश, राजस्थान आणि गुजरातला अवकाळी पावसाचा तडाखा बसला आहे. बुधवारी सुद्धा हवामान खात्याने देशातील काही भागांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

गुजरातच्या साबरकंठा जिल्ह्यातील हिम्मतनगर शहरात आज पंतप्रधान मोदींची रॅली आयोजीत करण्यात आली होती. रॅली साठी साकारण्यात आलेल्या मंडपाचा काही भाग कोसळला आहे. स्थानिक भाजप कार्यकर्त्यांनी मंडपाचा काही भाग उडाला असल्याचे सांगितले आहे. यादरम्यान गुजरातचे गृहमंत्री प्रदीप सिंह जडेजा रॅलीच्या तयारीची तयारीत व्यस्त होते.

देशाच्या विविध भागात झालेल्या पावसामुळे ३९ जणांचा मृत्यू झाला. देशावर अचानक आलेल्या संकटाचे दु:ख नरेंद्र मोदींनी ट्विटरच्या माध्यमातून व्यक्त केले आहे.