Japan Moon Mission : जपानच्या मून मिशन यशस्वी झाले आहे. तब्बल 5 महिन्यानंतर जापानचे स्मार्ट लँडर फॉर इन्व्हेस्टिगेटिंग मून (SLIM) आणि एक्स-रे इमेजिंग स्पेक्ट्रोस्कोपी मिशन (XRISM) चंद्रावर लँड झाले आहे. जपानी स्पेस एजन्सी JAXA ने आपल्या यानाच्या लँडिंगसाठी जागा निश्चित केली होती. या यानाने अचूक लँंडिग केले असून निश्चित जागेवरच हे यान लँड झाले आहे. चंद्रावर यान उतरवणारा जपान हा पाचवा देश ठरला आहे. भारताचे चांद्रयान 3 हे फक्त 40 दिवसात चंद्रावर पोहचले होते.
याआधी भारत, रशिया, अमेरिका आणि चीनचे यान चंद्रावर यशस्वीपणे लँड झाले आहेत. जपान हा चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करणारा पाचवा देश ठरला आहे. भारताची चांद्रयान 3 मोहिम यशस्वी झाल्यानंतर संपूर्ण जगाचे लक्ष जपानच्या या मून मिशनकडे होते. विशेष जपानी स्पेस एजेन्सीने या यानाच्या लँंडिग बाबत केलेला दाव खरा ठरला आहे. कारण हे यान सुनिश्चित केलेल्या जागेवरच लँड झाले आहे. जपानी स्पेस एजन्सी JAXA ने लँडिंगसाठी 600x4000 किमी जागा निवडली होती. या जागेत 100 मीटरच्या आतच या यानाने अचूक लँडिंग केले आहे. चंद्रावरील शिओली क्रेटर या जागेवर जपानचे हे यान लँड झाले.
शिओली क्रेटर या जागे जागेला Mare Nectaris असेही म्हणातात. हा प्रदेश चंद्राचा समुद्र म्हणून ओळखला जातो. चंद्रावरील या जागेत खूप गडद अंधार असतो. स्लिम लँडर प्रगत ऑप्टिकल आणि इमेज प्रोसेसिंग तंत्रज्ञानाने सुसज्ज आहे. या यानासोबत असलेल्या एक्स-रे इमेजिंग स्पेक्ट्रोस्कोपी मिशन (XRISM) पेलोडची निर्मिती जापान, नासा आणि यूरोपियन स्पेस एजन्सी यांनी एकत्रितरित्या केली आहे.
07 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी H-IIA रॉकेटद्वारे जपानच्या या यानाचे प्रक्षेपण झाले. जपानी स्पेस एजन्सी JAXA च्या तानेगाशिमा स्पेस सेंटरच्या योशिनोबू लॉन्च कॉम्प्लेक्समधून हे यान चंद्राकडे झेपावले. फेब्रुवारी 2024 मध्ये हे यान चंद्रावर लँडिंग करेल असे शक्यता वर्तवण्यात आली होती. या यानाच्या लँडिगसाठी 6 महिन्यांचा कालावधी लागेल अशी शक्यता वर्तवण्यात आली होती. प्रत्यक्षात मात्र, 5 महिन्यातच हे यान चंद्राच्या जवळ पोहचले आणि यशस्वी लँडिंग केले. रशियाचे LUNA यान चंद्रावर क्रॅश झाले होते. भारताच्या चांद्रयान 3 ने यशस्वी लँडिग करुन मोहिम यशस्वी केली. यामुळे आता जपानच्या मून लँडिगकडे सगळ्यांचेच लक्ष लागले होते.
23 ऑगस्ट रोजी भारताच्या चांद्रयान 3 ने चंद्राच्या पृष्ठभागावर सॉफ्ट लँडिंग केले. यानंतर 07 सप्टेंबर 2023 रोजी जपानचे स्मार्ट लँडर फॉर इन्व्हेस्टिगेटिंग मून (SLIM) अर्थात मून स्नायपरने आणि एक्स-रे इमेजिंग स्पेक्ट्रोस्कोपी मिशन (XRISM) लाँच झाले. हे यान अतिशय स्लिम आहे. यामुळे ते निश्चित केलेल्या जागेवर अचूक लँंडिग करेल असा दावा जपानने केला होता. अत्यंत अचूकपणे सुनिश्चित ठिकाणी चंद्रावर लँडिंग करण्याची क्षमता जपानला सिद्ध करायची होती. जपानने अचूक लँडिंग करत अखेर आपली क्षमता जगाला सिद्ध करुन दाखवली आहे.
जपानचे हे SLIM लँडर वजनाला खूपच हलके आहे. हे रोबोटिक लँडर आहे. XRISM च्या मदतीने चंद्रावर वाहणाऱ्या प्लाज्मा लहरींचा अभ्यास केला जाणार आहे. यामुळे ब्रम्हांडात ताऱ्यांची निर्मिती कशी झाली. तसेच आकाशगंगा याबाबतची अनेक रहस्य उलगडणार आहेत. या यानाने जास्तीत जास्त इंधनाची बचत करण्यासाठी गुरुत्वाकर्षण बलाचा अधिक वापर करत चंद्राच्या दिशेने मार्गक्रमण केले . यामुळे या यानाला चंद्राच्या कक्षेत पोहचण्यासाठी पाच महिन्यांचा कालावधी लागाला आहे.