दिल्लीच्या विवेक विहार येथे असलेल्या बेबी केअर सेंटरला आग लागली. यामध्ये 6 मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. आग लागल्याची माहिती मिळताच फायर ब्रिगेडच्या तब्बल 16 गाड्या घटनास्थळी पोहोचले. फायर ब्रिगेडच्या टिमने 12 मुलांना रेस्क्यू करण्यात आलं. आता आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलं आहे.
पोलीस आणि अग्निशमन विभागाने 12 मुलांची सुटका केली असून त्यापैकी 6 जणांचा मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 1 बालक व्हेंटिलेटरवर असून 5 मुले रुग्णालयात दाखल आहेत. मुलांना पूर्व दिल्लीच्या ॲडव्हान्स केअर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. दुसरीकडे, गुजरातमधील गेम झोनमध्ये लागलेल्या आगीत 27 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये 12 मुलांचा समावेश आहे.
#UPDATE फायर ऑफिसर राजेश ने कहा, "16 फायर टेंडर मौके पर हैं। आग पूरी तरह से बुझ गई है। करीब 11-12 लोगों को बचाया गया।" https://t.co/ueNkawfXRW pic.twitter.com/FtCDvvs0VL
— ANI_HindiNews (@AHindinews) May 25, 2024
बेबी केअर सेंटरमध्ये लागलेल्या आगीबाबत माहिती देताना अग्निशमन दलाच्या जवानांनी सांगितले की, रात्री 11.30 च्या सुमारास विवेक विहार परिसरातील ITI जवळील ब्लॉक बी मध्ये बेबी केअर सेंटरला आग लागल्याची माहिती मिळाली. ज्यानंतर 9 अग्निशमन दलाच्या गाड्या रवाना झाल्या. पण आग मोठी असल्यामुळे 7 आणखी गाड्या पाठवण्यात आल्या.
त्यांना रुग्णवाहिकेद्वारे जवळच्या गुप्ता नर्सिंग होम आणि पूर्व दिल्ली प्रगत नर्सिंग होममध्ये दाखल करण्यात आले. माहिती मिळताच अग्निशमन दल आणि पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले. बचाव पथकाने खिडकीतून नवजात बालकाची सुटका केली. अधिकाऱ्याने सांगितले की, बचाव मोहिमेदरम्यान टीमने इमारतीतून 11 नवजात बालकांची सुटका केली आहे. डीएफएस प्रमुख अतुल गर्ग यांनी दिलेल्या माहितीनुसार, आग आता नियंत्रणात आली आहे. आग लागण्याचे कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
हा अपघात झाला तेव्हा गेमिंग झोनमध्ये बरेच लोक उपस्थित होते. कारण तो शनिवार होता आणि गेमिंग झोनमध्ये 99 रुपयांची तिकीट योजनाही सुरू होती. गेमिंग झोन ऑपरेटरच्या निष्काळजीपणामुळे हा अपघात झाल्याचे समजते. याप्रकरणी पोलिसांनी 4 जणांना ताब्यातही घेतले आहे. यामध्ये टीआरपी गेम झोनचे मालक युवराज सिंग सोलंकी, त्याचा पार्टनर प्रकाश जैन, व्यवस्थापक नितीन जैन आणि आणखी एक व्यक्ती राहुल राठोड यांचा समावेश आहे.