7th Pay Commission: नव्या वर्षाची (New year) सुरुवात झाल्यानंतर नोकरदार वर्गाला या वर्षाकडून अनेक अपेक्षा असतात. हे वर्ष सुखाचं आणि यशाचं जावो यासोबत नोकरदार मंडळी आणखी एका गोष्टीसाठी प्रार्थना करत असतात. ती गोष्ट म्हणजे पगारवाढ (Salary hike). नव्या वर्षाचे पहिले दोन - तीन महिने उलटल्यानंतर अनेक संस्थांमध्ये पगारवाढीची सुरुवात होते. पण, आता यातही सरकारी कर्मचाऱ्यांना (Government jobs) पगारवाढीसाठी फारशी प्रतीक्षा करावी लागणार नाही. कारण, केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या (Central Government Employees) पगाराशी संबंधित एक आनंद देणारी बातमी समोर आली आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार तब्बल 52 लाख कर्मचाऱ्यांना याचा फायदा मिळणार आहे. 2022 च्या अखेरपर्यंत फिटमेंट फॅक्टरसंबंधी निर्णय होईल अशी अपेक्षा करण्यात आली होती. पण, काही कारणास्तव तसं होऊ शकलं नाही. आता नव्या वर्षात म्हणजेच 2023 मध्ये हा निर्णय दृष्टीक्षेपात असल्याचं म्हटलं जात आहे. केंद्राकडून लवकरच फिटमेंट फॅक्टर रिवाईज करण्याची मागणी केली जाऊ शकते. (7th Pay Commission impacts on salaryss)
गेल्या काही काळापासून केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांकडून फिटमेंट फॅक्टरमध्ये वाढ केली जाण्याची मागणी सातत्यानं सुरु आहे. यासंदर्भातील बैठकांनाही आता वेग आला आहे. सूत्रांच्या माहितीचा आधार घेतल्यास 2024 च्या आधी म्हणजेच यंदाच्या वर्षीचा केंद्रीय अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर लगेचच मार्च महिन्यामध्ये यासंदर्भातील घोषणा होऊ शकते. या निर्णयामुळं केंद्राच्या सेवेत असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या वेतनामध्ये मोठ्या फरकानं वाढ होणार हे निश्चित.
Fitment Factor बजावणार महत्त्वाची भूमिका
सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये Fitment Factor अतिशय महत्त्वाची भूमिका बजावतो. यामुळं संपूर्ण पगाराच्या आकड्यावर थेट परिणाम होतो. सध्या केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात 2.57 टक्के इतका फिटमेंट फॅक्टर असतो. त्यामध्ये वाढ करून आता हे प्रमाण 3.68 टक्के इतकं केलं जाण्याची मागणी करण्यात आली आहे. मार्च महिन्यापर्यंत या कर्मचाऱ्यांचा महागाई भत्तासुद्धा 38 टक्क्यांहून 42 टक्क्यांवर जाण्याची आशा व्यक्त करण्यात आली आहे.
सध्या केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचं किमान वेतन 18 हजार रुपये इतकं आहे. फिटमेंट फॅक्टर लागू झाल्यास ते 26 हजार रुपयांवर पोहोचणार आहे. दरम्यान अद्यापही सरकारकडून मात्र याविषयीची कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. 2.57 ट्क्के फिटमेंट फॅक्टरच्या हिशोबानं 18000 रुपये वेतन आणि भत्ते जोडले असता ते 18,000 X 2.57= 46260 इतकं होतं. आता यामध्ये वाढ झाल्यास ते 26000 X 3.68= 95680 इतकं होणार आहे. त्यामुळं आता ही वाढ नेमकी किती हे तुमच्या लक्षात आलंच असेल.