7th Pay Commission: सप्टेंबर महिन्यात सरकारी कर्मचारी होणार मालामाल

जवळपास 1.2 कोटी केंद्रीय कर्मचारी आणि निवृत्तीवेतन योजनेचा लाभ घेणाऱ्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे. केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात महागाई भत्ता Dearness Allowance, DA वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सरकारनं यासाठी मंजुरी दिल्यामुळं अनेक कर्मचाऱ्यांना याचा फायदा मिळणार आहे. 

Updated: Jun 30, 2021, 07:18 PM IST
7th Pay Commission: सप्टेंबर महिन्यात सरकारी कर्मचारी होणार मालामाल  title=
प्रतिकात्मक छायाचित्र

7th Pay Commission: जवळपास 1.2 कोटी केंद्रीय कर्मचारी आणि निवृत्तीवेतन योजनेचा लाभ घेणाऱ्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे. केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात महागाई भत्ता Dearness Allowance, DA वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सरकारनं यासाठी मंजुरी दिल्यामुळं अनेक कर्मचाऱ्यांना याचा फायदा मिळणार आहे. 

DA वाढीचं पत्रक जारी 

केंद्रीय कर्मचारी आणि निवृत्ती वेतन घेणाऱ्यांना DA आणि DR मध्ये वाढ झालेली रक्कम जुलै महन्याच्या वेतनात मिळणार नाही. यासाठी त्यांना सप्टेंबर महिन्यातील वेतनापर्यंत वाट पाहावी लागणार आहे. National council (Staff side)नं यासंदर्भातील पत्रक जारी केलं आहे. JCM सचिव शिव गोपाल मिश्रा यांच्या कर्यालयाकडून हे पत्रक जारी करण्यात आलं आहे. 

अखेर वाट मोकळी... 

सदर पत्रकानुसार 26 जून 2021 ला कॅबिनेट सचिवांसोबत झालेली बैठक सकारात्मक निकाली निघाली आहे. या बैठकीदरम्यान, केंद्रानं कर्मचाऱ्यांना हितार्थ अनेक निर्णय घेतले. ज्यामध्ये महागाई भत्त्यासंदर्भात मोठा निर्णय झाला. मागील 18 महिन्यांपासून प्रतीक्षेत असणाऱ्या DA बाबत निर्णयही झाला आहे. 

सप्टेंबरच्या वेतनात मिळणार सर्व रक्कम 

केंद्राचे कर्मचारी आणि निवृत्ती वेतन घेणाऱ्यांना जानेवारी 2020, जून 2020 आणि जानेवारी 2021 चे हफ्ते एकाच वेळी मिळण्याची शक्यता आहे. सप्टेंबर महिन्याच्या पगारात ही रक्कम येणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. यादरम्यान जून 2021साठीच्या महागाई भत्त्याचा डेटा जुलै 2021 मध्ये प्रसिद्ध केला जाणार आहे. सर्व देय रकमेमध्ये जून 2021 चा डीए आणि सोबतच मागील थकीत तीन हफ्तचे समाविष्ट असतील. सप्टेंबरच्या वेतनासोबतच सरकार जुलै आणि ऑगस्ट महिन्यातील अॅरियरही देणार आहे. 

28 टक्के दरानं मिळणार DA

सध्या केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना 17 टक्के दरानं महागाई भत्ता देण्यात येत आहे. तीन हफ्ते यामध्ये जोडले गेल्यानंतर हे प्रमाण 28 टक्क्यांवर पोहोचणार आहे. जानेवारी 2020 मध्ये DA मध्ये 4 टक्के, जून 2020 मध्ये 3 टक्के इतकी वाढ करण्यात आली होती. जानेवारी 2021 मध्ये यात 4 टक्क्यांनी वाढ झाली. त्यातच आता तीन हफ्त्यांची भर यात पडणार आहे, त्यामुळं DA मध्ये तब्बल 11 टक्क्यांनी वाढ होणार आहे.