मुंबई : कॅपिटल मार्केटमध्ये तुमचा पैसा तेजीने डबल ट्रिपल होऊ शकतो. परंतु इक्विटी मार्केटमध्ये पैसा लावण्यात रिस्क देखील तेवढीच आहे. ज्यांना कॅपिटल मार्केटचा अनुभव नाही. त्यांना नुकसान देखील सहन करावे लागते. म्हणूनच अनेक गुंतवणूकदार रिस्क फ्री इन्वेस्टमेंटच्या पर्यायाच्या शोधात आहेत. शेअर मार्केटमध्ये रिस्क घेण्याची इच्छा नसेल तर काही सरकारी आणि गैरसरकारी स्कीम्स आहेत. ज्यामुळे तुमचा पैसा सुरक्षितदेखील राहिल आणि स्थिर परतावा देखील मिळत राहिल.
सरकारी बॉंड
सुरक्षित गुंतवणूक पर्यायामध्ये सरकारी बॉंड G-Sec मिळतात. त्यांचा मॅच्युरिटी पिरिअड 1 ते 20 वर्ष इतका असु शकतो. सरकारी बॉंड असल्याने हा एक सुरक्षित गुंतवणूक पर्याय मानला जातो. येथे ७ ते ८ टक्के वर्षिक परतावा मिळतो. शिवाय सरकारी बॉंडच्या व्याजावर टीडीएस कापला जात नाही.
पीपीएफ PPF
पब्लिक प्रोविडंट फंड म्हणजेच PPF लॉंग टर्म गुतंवणूकदारांसाठी चांगला पर्याय आहे. या योजनेचा म्युच्युरिटी कालावधी 15 वर्षे आहे. आणि सध्याचे व्याज 7.1 टक्के आहे. पीपीएफच्या व्याजावर टॅक्स लागू नाही.
शॉर्ट टर्म डेट फंड
रिस्क फ्री इन्वेस्टमेंटमध्ये शॉर्टटर्म डेट फंडसुद्धा आहेत. ज्यामध्ये 1 दिवस. 30 दिवस, 91 महिन्यांचा मॅच्युरिटी पिरिअड असतो. येथे पैसे ब्लॉक होत नाही. तसेच स्मॉल सेविंगपेक्षा जास्त परतावा मिळतो.
सुकन्या समृद्धी योजना
सुकन्या समृद्धी योजना मुलींसाठी पोस्ट ऑफिसची प्रसिद्ध स्कीम आहे. या योजनेत वार्षिक 7.6 टक्के व्याज मिळते. १० वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलींचे खाते या योजनेअंतर्गत सुरू करता येते.
नॅशनल सेविगं सर्टिफिकेट
नॅशनल सेविंग सर्टिफिकेट म्हणजेच NSC ची सुविधा देशातील प्रत्येक पोस्ट ऑफिसमध्ये उपलब्ध आहे. वार्षिक 6.8 टक्के व्याज मिळते. जे एफडीच्या मानाने जास्त असते. त्याची म्युच्युरिटी 5 वर्षाची असते. तसेच 1.5 लाख रुपयांपर्यंतच्या सेविंगच्या व्याजावर टॅक्स लागू होत नाही.