मोदी सरकारचा मोठा निर्णय, महिन्याला ६-१८ हजार रुपये जास्त मिळणार

 केंद्र सरकारनं सर्वसामान्यांना दिलासा देणारा निर्णय घेतला आहे.

Updated: Jun 12, 2018, 10:27 PM IST
मोदी सरकारचा मोठा निर्णय, महिन्याला ६-१८ हजार रुपये जास्त मिळणार title=

नवी दिल्ली : केंद्र सरकारनं सर्वसामान्यांना दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. याचा फायदा २३ लाख निवृत्त शिक्षक आणि विद्यापीठाचे शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना होणार आहे. केंद्र सरकारनं केंद्रीय विद्यापीठ आणि कॉलेजमध्ये काम केलेल्या निवृत्त शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या पेन्शनमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. ७व्या वेतन आयोगानुसार या पेन्शनमध्ये बदल करण्यात आलाय. या निर्णय लागू झाल्यानंतर पेन्शन धारकांना ६ हजार ते १८ हजार रुपयांपर्यंतचा फायदा होणार आहे. 

मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे. या निर्णयामुळे २५ हजार पेन्शन धारकांना, ८ लाख शिक्षक आणि १५ लाख शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना होणार असल्याचं जावडेकर म्हणाले.