Aadhaar Card Online Update: आधार कार्ड हे महत्त्वाचं सरकारी दस्ताऐवज आहे. कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ घेण्यासाठी, बँकेत खाते उघडण्यासाठी किंवा अशा इतर सुविधांचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड (Aadhaar Card) आवश्यक आहे. आधार कार्डमध्ये काही चूक असल्यास आधार केंद्रावर जाऊन दुरुस्त करणं कटकटीचं असतं. आधार केंद्रावर लांबलचक रांगेत उभं राहून दुरुस्त्या करणं म्हणजे डोकंदुखी ठरतं. आता सरकारने ही अडचण लक्षात काही अपडेट केलेल आहेत. UIDAI ने ट्विटमध्ये सांगितलं आहे की, तुम्ही तुमच्या मोबाईलवरूनच (Mobile Online Aadhaar Update) आधारकार्डमधील काही तपशील दुरुस्त करू शकाल.
UIDAI ने ट्वीटमध्ये म्हटले आहे की, 'तुम्ही तुमचे नाव, जन्मतारीख, लिंग, पत्ता (Name, Birthdate, Address) ऑनलाइन सहजपणे अपडेट करू शकता आणि एसएमएसमध्ये मिळालेल्या OTP द्वारे ते प्रमाणीकृत करू शकता. ऑनलाइन दुरुस्त्या करण्यासाठी तुम्हाला 50 रुपये शुल्क भरावे लागेल. जे तुम्ही UPI द्वारे ऑनलाइन पेमेंट करू शकता.'
#UpdateMobileInAadhaar#AzadiKaAmritMahotsav
You can easily Update Demographic Details (Name, DoB, Gender, Address) online, and authenticate via OTP received in SMS. You’ll be charged ₹50 for mobile update, with or without other demographic data update. #AadhaarUpdate pic.twitter.com/lFfCJYLl3W— Aadhaar (@UIDAI) August 30, 2022
ज्यांचे आधार मोबाईलशी लिंक केले आहे तेच लोक मोबाईलवरून आधारकार्डवरील चुका सुधारू शकतील. ज्या लोकांचे आधारकार्ड मोबाईल क्रमांकाशी लिंक झालेले नाहीत, अशा लोकांना आधी आधार केंद्रावर जाऊन ते आधारशी लिंक करावे लागेल. यानंतरच तुम्ही घरी बसून मोबाईलमधून कोणतीही सुधारणा करू शकाल. एकदा मोबाईल नंबर आधारशी जोडला गेला की, तुम्हाला पुन्हा काही दुरुस्ती हवी असल्यास तुम्ही ऑनलाइन दुरुस्ती करू शकाल.