आचार्य बालकृष्णांच्या संपत्तीत १७३ टक्के वाढ

पतंजलीचे सीईओ आचार्य बालकृष्ण यांनी भारतातील सर्वात श्रीमंतांच्या यादीत आठव्या क्रमांकावर स्थान मिळवलंय. 

Updated: Sep 28, 2017, 07:31 PM IST
आचार्य बालकृष्णांच्या संपत्तीत १७३ टक्के वाढ  title=

नवी दिल्ली : पतंजलीचे सीईओ आचार्य बालकृष्ण यांनी भारतातील सर्वात श्रीमंतांच्या यादीत आठव्या क्रमांकावर स्थान मिळवलंय. 

चीनी रिसर्च ऑर्गनायझेशन 'हुरून'नं भारतातील श्रीमंतांची यादी जाहीर केलीय. उल्लेखनीय म्हणजे गेल्या वर्षी या यादीत बालकृष्ण २५ व्या स्थानावर होते. 

 

यंदा बालकृष्ण यांची संपत्ती १७२ टक्के वाढून ७० हजार करोडवर पोहचलीय. बालकृष्णी यांची संपत्ती वाढण्यासाठी नोटाबंदी आणि जीएसटीहून मदत मिळाली, असं हुरूननं म्हटलंय. नोटाबंदीचा संगठीत क्षेत्रावर सकारात्मक प्रभाव पडल्याचंही हुरूननं म्हटलंय. 

४४ वर्षीय बालकृष्ण मार्चमध्ये 'फोर्ब्स'च्या यादीत २०४३ श्रीमंतांच्या यादीत ८१४ व्या क्रमांकावर होते.