Act 420 canceled: 1 जुलैपासून देशभरात 3 नवीन कायदे लागू झाले आहेत. भारतीय न्याय सहिंता, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता आणि भारतीय पुरावा अधिनियम यांचा समावेश आहे. त्यामुळे दीडशे वर्षे जुने इंडियन पिनल कोड म्हणजेच आयपीसी कलम रद्द झाले आहे. आता ज्या आरोपीला 30 जून रोजी फसवणुकीच्या आरोपात अटक केली त्यावर IPC च्या कलम420 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात येईल. पण 1 जुलैपासून केंद्र सरकारकडून 420 चा कायदा रद्द झालाय. अशावेळी त्या आरोपीवर कोणत्या कलमाअंतर्गत गुन्हा दाखल होणार? आणखी कोण-कोणते कायदे बदलले? याची माहिती जाणून घेऊया.
सर्वसाधारणपणे फसवणूक करणाऱ्यांविरोधात 420 हे कलम लावले जाते. पण 1 जुलैपासून त्याऐवजी 318 कलमाचा वापर केला जाईल. याशिवाय कलम 302 च्या ऐवजी कलम 103 असेल. एवढी माहिती मिळाल्यावर30 जूनपर्यंत आयपीसी कलमाअंतर्गत गुन्हा दाखल झालेल्यांवर कोणत्या कलमाअंतर्गत कोर्टात कोणत्या कलमाअंतर्गत सुनावणी होणार? असा प्रश्न पडला असेल. यासंदर्भात अॅडव्होकेट अश्वनी उपाध्याय यांनी उत्तर दिले आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्यांच्यावर 30 जूनच्या आधी आयपीसी कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय त्यांच्यावर त्याच कलमाअंतर्गत कारवाई होईल. फसवणुकीच्या आरोपात 30 जुलै रात्री 12 वाजेपर्यंत ज्या कलमाअंतर्गत गुन्हा दाखल असेल त्यावर कोर्टातदेखील त्याच कलमाअंतर्गत खटला चालेल असे त्यांनी सांगितले.
आयपीसी आणि सीआरपीसी कलम इंग्रजांच्या जमान्यापासून चालत आले आहेत. गुन्हेगारांच्या प्रवृत्तीमध्ये बदल झालाय तिथे सरकारच्या कायद्यामध्येदेखील बदल होण्याची आवश्यकता आहे. जे कायदे आजपासून लागू झाले आहेत.
नव्या कायद्यानुसार, गुन्हेगारी प्रकरणांमधील सुनावणी संपल्यानंतर 45 दिवसांच्या आत निर्णय येईल. यासोबतच पहिल्या सुनावणीच्या 60 दिवसांच्या आत आरोप ठरवले जातील. सर्व राज्य सरकारांनी साक्षीदारांना सुरक्षा देण्यासाठी नियोजन करायला हवे. तसेच ट्रान्सजेंडर यांनादेखील कायद्यात स्थान असून यामुळे समानेतेचे महत्व वाढते. नवीन गुन्हेगारी कायद्यांतर्गत, तुम्ही कुठूनही गुन्हा नोंदवू शकता. तुम्ही FIR ऑनलाइन नोंदवू शकता. पोलीस ठाण्यात जाण्याची गरज नाही. झिरो एफआयआर सुरू करण्यात आला असून त्याद्वारे कोणीही कोणत्याही पोलीस ठाण्यात एफआयआर नोंदवू शकतो.