VIDEO : नाटकांत वापरला खरा साप, अभिनेत्रीचा मृत्यू

VIDEO : नाटकांत वापरला खरा साप, अभिनेत्रीचा मृत्यू

मुंबई : नाटकांत आतापर्यंत अनेक गोष्टी खोट्या वापरल्या जातात. पण जेव्हा नाटकांत खरा साप पावरला जातो तेव्हा... पश्चिम बंगालच्या एका नाटकांत खऱ्या सापाचा वापर केला गेला. आणि त्याच्या चावण्यामुळे 63 वर्षीय एका अभिनेत्रीचा मृत्यू झाला आहे. ही घटना मंगळवारी रात्री हसनाबाद पोलीस स्टेशनच्या बारूनहाट गावातील ही घटना आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिनेत्री कालिदासी मंडल यांना साप चावल्यानंतर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. जिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं आहे. तिथेच एका सह कलाकार अभिनेत्रीने आरोप लावला आहे की या घटनेनंतर एका व्यक्तीने त्या अभिनेत्रीला उठवण्याचा प्रयत्न केला मात्र तो असफल ठरला. 

सह अभिनेत्रीने सांगितलं की, मंडळ या अभिनेत्रीला प्राथमिक रूग्णालयात दाखल केलं गेलं. आणि तिथेच तिचा मृत्यू झाला. भारतात अनेक क्षेत्र आहेत जिथे अजूनही विश्वास आहे की मंत्र वाचून सापाच विष काढलं जातं. कोणत्याही औषधाचा वापर न करता त्याला तिचा मृत्यू झाला.