राहुल गांधी यांनी लोकसभा निवडणुकीआधी अदिती सिंग यांच्यावर सोपवली मोठी जबाबदारी

आदिती सिंग रायबरेली विधानसभा मतदारसंघातून पाच वेळा आमदार झालेले अखिलेश सिंग यांची मुलगी आहे.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Aug 24, 2018, 09:19 PM IST
राहुल गांधी यांनी लोकसभा निवडणुकीआधी अदिती सिंग यांच्यावर सोपवली मोठी जबाबदारी title=

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी उत्तर प्रदेशातील रायबरेली मतदारसंघातून पाचवेळा आमदार राहिलेले अखिलेश सिंग यांची मुलगी अदिती सिंग यांच्यावर मोठी जबाबदारी दिली आहे. अखिल भारतीय महिला काँग्रेसचे सरचिटणीसपदी आदिती यांची नियुक्ती केली आहे. 

अदिती सिंग दोन महिन्यांपूर्वी चर्चेत आली होती. जेव्हा राहुल गांधी यांच्यासोबत त्यांच्या विवाहाची अफवा सोशल मीडियावर पसरली होती. नंतर, अदिती सिंग यांनी ही बातमी खोटी असल्याचे स्पष्टीकरण दिले. राहुल गांधी हे त्यांचे राखी बांधणारे बंधू असल्याचे सांगितले. अदिती म्हणाल्या की राहुल गांधी आणि त्यांच्या कुटुंबाचे खूप जुने कौटुंबीक संबंध आहेत.  सोशल मीडियावर वरिल छायाचित्र व्हायरल झाले होते.

aditi singh

अदिती सिंग अखिलेश सिंह यांच्या कन्या आहेत. रायबरेली मतदारसंघातून पाचवेळा ते आमदार झाले आहेत. २०१७ मध्ये अदिती काँग्रेसच्या माध्यमातून राजकीय प्रवाहात सहभागी झाल्यात. प्रियांका गांधी-वढेरा यांच्या जवळचे म्हणून त्यांना ओळखले जाते. अदिती अमेरिकेच्या ड्यूक विद्यापीठातून व्यवस्थापनाचे धडे घेतले आहेत. २०१७ च्या पहिल्या निवडणुकीत त्यांनी जवळच्या प्रतिस्पर्ध्याला ९० हजार मतांनी पराभूत केले. 

अल्पेश ठाकोर यांना मोठी जबाबदारी

गुजरातमधील ओबीसी नेते आणि राधानगर मतदारसंघाचे आमदार अल्पेश ठाकोर यांना काँग्रेसने मोठी जबाबदारी दिली आहे. अल्पेश यांना बिहार काँग्रेस सचिव आणि सहप्रभारीपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपसमोर आव्हान उभे करण्यात अल्पेश यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. याची दखल काँग्रेसने घेतली आहे. सध्या काँग्रेस संघटनेत अनेक बदल केले जात आहेत. वरिष्ठ काँगेस नेते अहमद पटेल यांना खजिनदारपद सोपविण्यात आले आहे. तर वयोवृद्ध नेते मोतीलाल वोहरा यांच्याकडे महासचिव (प्रशासन) पदाची जबाबदारी देण्यात आली.