अल्पेश ठाकोर यांच्यावर काँग्रेसची मोठी जबाबदारी

ओबीसी नेते आणि राधानगर मतदारसंघाचे आमदार अल्पेश ठाकोर यांना काँग्रेसने मोठी जबाबदारी दिली आहे. 

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Aug 24, 2018, 08:15 PM IST
अल्पेश ठाकोर यांच्यावर काँग्रेसची मोठी जबाबदारी title=

नवी दिल्ली : पक्षाला नवसंजवनी देण्यासाठी काँग्रेसमध्ये अनेक बदल करण्यात येत आहेत. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी नवी टीम बांधली आहे. यात तरुण नेत्यांना स्थान दिले जात आहे. आता गुजरातमधील ओबीसी नेते आणि राधानगर मतदारसंघाचे आमदार अल्पेश ठाकोर यांना काँग्रेसने मोठी जबाबदारी दिली आहे. 

अल्पेश यांना बिहार काँग्रेस सचिव आणि सहप्रभारीपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपसमोर आव्हान उभे करण्यात अल्पेश यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. याची दखल काँग्रेसने घेतली आहे. सध्या काँग्रेस संघटनेत अनेक बदल केले जात आहेत. वरिष्ठ काँगेस नेते अहमद पटेल यांना खजिनदारपद सोपविण्यात आले आहे. तर वयोवृद्ध नेते मोतीलाल वोहरा यांच्याकडे महासचिव (प्रशासन) पदाची जबाबदारी देण्यात आली.

राजस्थानमधील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सी.पी. जोशी यांच्या जागी लुईजिन फालेरो यांना ईशान्येच्या राज्यांच्या (आसाम वगळून) प्रभारी महासचिवपदी नेमण्यात आलेय. राज्यसभेचे खासदार आनंद शर्मा यांना पक्षाच्या विदेश विषयक विभागाचे अध्यक्षपद देण्यात आले आहे. मीरा कुमार यांना काँग्रेस कार्यकारिणीत कायमस्वरुपी आमंत्रित सदस्य म्हणून समाविष्ट करण्यात आले आहे.