रवा डोसा आणि फिल्टर कॉफीसाठी राहुल गांधींची स्वारी हॉटेलमध्ये जाते तेव्हा...

राहुल गांधी अचानक हॉटेलमध्ये आल्याने कर्मचारी अचंबित

Updated: Feb 1, 2019, 09:20 AM IST
रवा डोसा आणि फिल्टर कॉफीसाठी राहुल गांधींची स्वारी हॉटेलमध्ये जाते तेव्हा... title=

नवी दिल्ली: काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी गुरुवारी अचानकपणे दिल्लीतील एका साध्या हॉटेलमध्ये जाऊन सर्वांनाच अचंबित केले. संसदेच्या सेंट्रल हॉलमधील काम आटोपल्यानंतर राहुल यांनी आपला मोर्चा दक्षिण दिल्लीतील अशोक हॉटेलकडे वळवला. यावेळी राहुल गांधी यांच्यासोबत मोजकेच सुरक्षारक्षक होते. मात्र, राहुल गांधी यांना बघितल्याने हॉटेलमधील कर्मचारी आणि ग्राहकांना आश्चर्याचा धक्का बसला. याठिकाणी राहुल यांनी रवा डोसा आणि फिल्टर कॉफी प्यायली, अशी माहिती येथील कर्मचाऱ्याने दिली. 

फोटोग्राफरच्या मदतीला असे धावले राहुल गांधी

राहुल गांधी काही दिवसांपूर्वीच सोनिया गांधी यांच्यासोबत सुट्टीसाठी गोव्यात गेले होते. याठिकाणीही त्यांनी सामान्य लोकांसोबत सेल्फी काढले होते. यावेळी सोनिया आणि राहुल यांना सामान्य लोकांप्रमाणे वावरताना पाहून अनेकजण अचंबित झाले होते. यावेळी डेंटिस्ट रचना फर्नांडिस यांनी राहुल गांधी यांच्यासोबतचा फोटो ट्विट केला होता. रचना आपल्या काही नातेवाईकांबरोबर याठिकाणी आल्या होत्या. त्यावेळी सोनिया व राहुल गांधी त्यांना दिसले. तेव्हा रचना यांनी राहुल गांधी यांना सेल्फी काढण्यासाठी विचारले. यावर मी तुमचे बिल भरेन, या अटीवर सेल्फी काढायला राहुल गांधी तयार झाले. रचना यांचे बिल भरल्यानंतर राहुल यांनी त्यांच्यासोबत सेल्फी काढला. हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. 

राहुल गांधी-सोनिया गांधी गोव्यात सुट्टीवर