जिच्यासोबत लग्न केलं, तिला पाहिल्यानंतर पतीवर का आली पळून जाण्याची वेळ

एवढचं नव्हे तर, तिच्यासोबत नक्की काय घडतंय

Updated: Dec 19, 2021, 05:58 PM IST
 जिच्यासोबत लग्न केलं, तिला पाहिल्यानंतर पतीवर का आली पळून जाण्याची वेळ title=

मुंबई : लग्न हा प्रत्येक मुलीच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा आणि अविस्मरणीय असा क्षण असतो. प्रत्येक मुलीला असं वाचतं की तिच्या होणाऱ्या पतीने आयुष्यभर तिची साथ द्यावी. तिच्यावर भरभरुन प्रेम करावं. पण एका नववधूला हा अनुभव घेताच आलेला नाही. या नववधूला लग्न केल्यानंतर पतीकडून पहिल्या रात्रीपासूनच आदर किंवा प्रेम मिळालं नाही.

एवढचं नव्हे तर, तिच्यासोबत नक्की काय घडतंय याचा अंदाज ही तिला आला नाही. लग्न करुन सासरी जाण्यासाठी उत्सुक असलेल्या मुलीला सासरच्यांनी घराचा उंबरठा देखील ओलांडू दिला नाही.

झारखंडमधील गोड्डा येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जिथे पहिल्यांदा सासरी गेलेली नवरी घराबाहेरच धरणावर बसली आणि नवरा गुपचूप पळून गेला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून नववधूला पोलिस ठाण्यात आणले.

चौकशीदरम्यान तरुणीने पोलिसांना सांगितले की, तिचा विवाह कान्हावरा गावातील हरिराम साह याच्याशी 8 महिन्यांपूर्वी झाला होता. मात्र लग्नानंतर तिचा पती हरिराम तिला आपल्या घरी नेण्यास टाळाटाळ करू लागला.

 आठ महिने निघून गेले, त्यानंतर वधूने स्वतःच सासरच्या घरी जाण्याचा निर्णय घेतला आणि आपल्या कुटुंबीयांसह पोहोचली. मात्र सासरच्यांनी तिला घरात येऊ दिले नाही. त्यानंतर ती सासरच्या घराबाहेर धरणे धरून बसली. नववधूला धरणावर बसलेले पाहून गावातील लोक जमा झाले आणि त्यांनी मोबाईलवरून व्हिडिओ बनवण्यास सुरुवात केली.

वधूचे म्हणणे आहे की, तिने सासरच्या मंडळींकडून अनेकवेळा कारण जाणून घेण्याचा प्रयत्न केला, पण तिला स्पष्टपणे काहीही सांगितले नाही. मुलाच्या कुटुंबीयांना वधूला सोबत ठेवायचे नव्हते असा आरोप आहे.

पोलिसांनी वधूला पोलीस ठाण्यात आणले.

यादरम्यान कोणीतरी पोलिसांना फोन करून या प्रकरणाची माहिती दिली. मुलीला समजवण्याचा प्रयत्न केल्यानंतर तिला पोलिस ठाण्यात नेले. या घटनेबाबत गोड्डाचे उपविभागीय पोलीस अधिकारी आनंद मोहन सिंग यांनी सांगितले की, मुलीने गुन्हा दाखल करण्यास नकार दिला आहे. तिला आनंदाने सासरच्या घरी जायचे आहे. सासरचे लोक वधूला ठेवण्यास का तयार नाहीत, याचे कारण जाणून घेण्याचा प्रयत्न सुरू आहे.

पोलिसांनी दोन्ही बाजूंना बोलावले

त्याचवेळी पोलिसांना दोन्ही बाजूंना समजावून सांगून प्रकरण संपवायचे आहे. फरार मुलाच्या कुटुंबीयांना पोलीस ठाण्यात बोलावण्यात आले आहे. दोन्ही पक्ष समोरासमोर बसून चर्चा करतील. त्यानुसार पोलीस पुढील कारवाई करणार आहेत. सध्या पोलिसांनी वराचाही शोध सुरू केला आहे.