अयोध्येत रामजन्मभुमीनंतर आता 'या' राज्यात होणार प्रभू श्रीराम यांचं भव्य आजोळ

भक्तांसाठी ही अत्यंत आननंदाची बाब आहे.   

Updated: Aug 4, 2020, 09:05 AM IST
अयोध्येत रामजन्मभुमीनंतर आता 'या' राज्यात होणार प्रभू श्रीराम यांचं भव्य आजोळ  title=

नवी दिल्ली : एकिकडे अयोध्येत राममंदिराच्या भूमिपूजनाची तयारी सुरू झाली आहे. तर दुसरीकडे प्रभू श्रीराम यांचं आजोळ देखील एक भव्य तिर्थक्षेत्र म्हणून विकसित होण्याच्या मार्गावर आहे. सांगायचं झालं तर छत्तीसगडची ओळख प्रभू श्रीराम यांचं आजोळ म्हणून करण्यात येते. जी महर्षी वाल्मिकी यांची तपोभूमी देखील आहे. छत्तीसगडच्या सरकारने आता या स्थळांना तिर्थ क्षेत्र म्हणून विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे. 

राज्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, या पवित्र भूमीवर श्रीराम यांची माता कौशल्या यांचा जन्म झाला होता. त्याचप्रमाणे रामायण (Ramayana)च्या माध्यमातून संपूर्ण जगासमोर रामकथा मांडणाऱ्या महर्षी वाल्मिकी यांनी या पवित्र भूमीवर साधना देखील केली होती. 
 
माता कौशल्यांचे जन्मस्थळाप्रमाणेच वाल्मीकि आश्रमसुद्धा पर्यटन-तीर्थक्षेत्र म्हणून विकसित करण्यासाठी रुपरेषा तयार करण्यात आल्याचं वक्तव्य वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केलं. त्यामुळे आता भक्तांसाठी ही अत्यंत आननंदाची बाब आहे. 

दरम्यान, मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी २९ जुलैरोजी आपल्या कुंटुंबीयांसोबत येथील प्राचीण मंदिरांमध्ये पूजा-अर्चा देखील केली. यावेळी त्यांनी पुरातन मंदिरांचं सौंदर्य आणि मंदिर विस्तारासंबंधीत सर्व माहिती घेतली. शिवाय मंदिरांचं मूळरूप कायम ठेवत येथे येणाऱ्या भक्तांवर विशेष लक्ष ठेवण्याचे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.